सूरज चव्हाणनं नवीन घराला दिलंय खूपच खास नाव, नेमप्लेट पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:25 IST2025-12-21T14:17:52+5:302025-12-21T14:25:29+5:30
घराला 'बिग बॉस' नाव देणार होता सूरज चव्हाण; पण प्रत्यक्षात नेमप्लेटवर दिसलं दुसरंच नाव

सूरज चव्हाणनं नवीन घराला दिलंय खूपच खास नाव, नेमप्लेट पाहिलीत का?
Suraj Chavan New Home Nameplate : 'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाण सध्या चर्चेत आला आहे. 'बिग बॉस'मध्ये असताना आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा सूरजने व्यक्त केली होती. यानंतर शो संपल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला नवीन घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर वर्षभरातच सूरजने त्याच्या आलिशान बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. या नव्या घराला सूरज नाव काय देणार, याबद्दल त्यांच्य चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर सूरज चव्हाणने त्याच्या नवीन घराला खूपच खास नाव दिलंय.
'बिग बॉस'च्या घरात असताना सूरजने एक इच्छा व्यक्त केली होती की, ज्या शोने त्याला ओळख दिली, त्या शोचे नाव तो आपल्या घराला देईल. मात्र, आता सूरजनं लहानपणीच गमावलेल्या आपल्या आई-वडिलांना घराच्या नेमप्लेटच्या माध्यमातून आयुष्यभर आठवणीत ठेवण्याच प्रयत्न केलाय. सूरजनं आलिशान बंगल्याला 'आई-आप्पांची पुण्याई' असं नाव दिलं आहे. सूरजने अगदी लहानपणीच आपले आई-वडील गमावले होते. गरिबी आणि संघर्षातून वर आलेल्या सूरजने आज जे काही यश मिळवले आहे, ते आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच, अशी त्याची धारणा आहे. त्यामुळे 'बिग बॉस' नाव देण्याऐवजी त्याने आपल्या आई-वडिलांना हे घर समर्पित केले आहे.
सूरजच्या घराच्या बाहेर आणखी एक महत्त्वाची नेमप्लेट पाहायला मिळत आहे. यावर 'श्री. सूरज चव्हाण आणि सौ. संजना चव्हाण' अशी नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच सूरजने संजनासोबत लग्नगाठ बांधली होती. आपल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश करताना त्याने आपल्या पत्नीलाही तितकाच सन्मान दिल्याचे या नेमप्लेटवरून दिसून येते.
