Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:42 IST2024-10-06T18:42:03+5:302024-10-06T18:42:31+5:30
Bigg Boss Marathi 5 : अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. पण, फिनालेआधीच इन्स्टाग्रामवरील एका पोस्टने खळखळ उडाली आहे.

Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या काही वेळातच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाचा विजेता चाहत्यांना मिळणार आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण, फिनालेआधीच इन्स्टाग्रामवरील एका पोस्टने खळखळ उडाली आहे.
बिग बॉस मराठी ५ चे अपडेट्स देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बिग बॉस मराठी ५चा विजेता कोण? याबाबत माहिती देण्यात आली आहे. सूरज चव्हण बिग बॉस मराठी ५ चा विजेता असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच सूरजला चाहत्यांचा फूल सपोर्ट मिळाला आहे. सूरजने त्याच्या स्टाइलने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली. त्यामुळे सूरजनेच बिग बॉस मराठी ५च्या ट्रॉफीवर नाव कोरावं अशी चाहत्यांची इच्छा होती. आता बिग बॉस मराठी ५च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे काही वेळातच कळणार आहे.