कोकण कन्या अंकिता की वर्षा उसगांवकर, आज कोण घेणार घराचा निरोप? नाव आलं समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 15:23 IST2024-10-03T15:09:23+5:302024-10-03T15:23:28+5:30
येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

कोकण कन्या अंकिता की वर्षा उसगांवकर, आज कोण घेणार घराचा निरोप? नाव आलं समोर!
Bigg Boss Marathi Season 5 Elimination : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. आज 'बिग बॉस'च्या घरात Mid-Week एलिमिनेशन होणार आहे. सध्या घरात सात सदस्य आहेत, त्यापैकी आज कोण घराचा निरोप घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेले आहे. अशातच आता एका स्पर्धकाचं नाव सोशल मीडियावर समोर येत आहे, ज्याचा प्रवास संपला आहे.
'बिग बॉस'च्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेटेड आहेत. आता यांच्यापैकी आज एक जण घराचा निरोप घेणार आहे. सुरुवातीला अंकिता ही आज घरातून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यानंतर मराठी कलाविश्वातील 'वंडरगर्ल' वर्षा उसगांवकर या घराबाहेर जाणार असल्याची पोस्ट 'बिग बॉस मराठी'बद्दल अपडेट देणाऱ्या bigbossmarathinews या पेजने शेअर केली आहे.
निक्की तांबोळी ही 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे थेट ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली आहे. निक्कीसोबत कोणते स्पर्धक हे फिनालेमध्ये पोहचतात आणि कोणत्या स्पर्धकांचा प्रवास संपतो, हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. शिवाय आजच्या एपिसोडमध्ये स्पर्धक हे डीजे क्रेटेक्सच्या तालावर थिरकताना पाहायला मिळणार आहेत. Bigg Boss Marathi 5 वे पर्व ब्लॉकबस्टर ठरले असून ७० दिवसांत हा शो संपतोय.