होणार ढोल ताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर! कधी येतोय बिग बॉस मराठी 5? तारीख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:02 IST2024-07-12T14:02:31+5:302024-07-12T14:02:45+5:30
Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखच्या स्टाईलने होणार कल्ला, कधी येतोय बिग बॉस मराठी 5?

होणार ढोल ताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर! कधी येतोय बिग बॉस मराठी 5? तारीख...
Bigg Boss Marathi 5: ज्याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत तो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे महेश मांजरेकरांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख शो होस्ट करणार आहे. काही दिवसांपासून बिग बॉस मराठी 5 चा प्रोमो येत आहे. यात रितेशचा लूकही रिव्हील झाला आहे. मात्र नक्की बिग बॉस मराठी 5 कधी सुरु होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
कलर्स मराठीने बिग बॉस मराठी 5 चा आणखी एक प्रोमो शेअर करत अखेर एक दिलासा दिला आहे. तो म्हणजे आज संध्याकाळी बिग बॉस मराठी 5 कधी सुरु होणार याची तारीख जाहीर होणार आहे. अखेर प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करते होते ती आता संपली आहे. आज संध्याकाळी बिग बॉसची 5 ची तारीख जाहीर होईल. "होणार ढोल ताशांचा गजर,
सळसळणार उत्साहाची लहर! आज संध्याकाळी, जाहीर होणार बिग बॉस मराठीची ‘तारीख’. मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी” लवकरच...फक्त कलर्स मराठीवर" असं म्हणत नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
'खूप वाट बघितली राव, आज तारीख कळेल खूप उत्सुकता आहे' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.' रितेश दादा मुळे शो सुपरहिट होणारच यात काडीमात्र शंका नाही, पहिलं प्राधान्य मराठी बिग बॉसला' असं म्हणत रितेश देशमुखचं स्वागत केलं आहे.
रितेश देशमुखने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला, 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे.