निक्कीचं नक्की चाललंय काय? अरबाज परत आला तसं अभिजीतकडे फिरवली पाठ, म्हणते- "मी आणि तो आता एकत्र..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:14 IST2024-09-04T13:13:30+5:302024-09-04T13:14:08+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : गेल्याच आठवड्यात निक्की आणि अरबाजमध्ये मोठं भांडण झालं होतं. यावेळी अभिजीत निक्कीच्या बाजूने होता. पण, आता वाद मिटल्यानंतर मात्र निक्की अभिजीतच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळत आहे.

निक्कीचं नक्की चाललंय काय? अरबाज परत आला तसं अभिजीतकडे फिरवली पाठ, म्हणते- "मी आणि तो आता एकत्र..."
Bigg Boss Marathi Season 5 : निक्की तांबोळी कोणत्या ना कोणत्या कारणाने बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेत असते. या आठवड्यातही वर्षाताई कॅप्टन असल्यामुळे निक्कीने कोणतंच काम करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा घरात वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्याच आठवड्यात निक्की आणि अरबाजमध्ये मोठं भांडण झालं होतं. यावेळी संपूर्ण घराने अरबाजला पाठिंबा दिला होता. तर अभिजीत निक्कीच्या बाजूने होता. पण, आता वाद मिटल्यानंतर मात्र निक्की अभिजीतच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गार्डन एरियात निक्की-अरबाज सोफ्यावर बसले आहेत. तर दुसरीकडे वर्षाताई आणि अभिजीत सावंत बसल्याचं दिसत आहे. निक्की अरबाजला म्हणते, "मी जेवण बनवायला तयार आहे. मी जेवण बनवेन आणि सगळ्या सदस्यांसाठी बनवेन. ते कोणी खाऊ दे किंवा नको खाऊ दे". तर दुसरीकडे वर्षाताई आणि अभिजीतमध्ये निक्की-अरबाजबद्दल चर्चा होताना दिसत आहे.
वर्षाताई अभिजीतला म्हणतात, "अरबाजच्या मागे घरातले सगळे आम्ही उभे राहिलो होतो. त्याचं हेच पांग फेडणार आहे का तो? तो टॅग पुसून टाकण्यासाठी तू हे करणारेस का?". त्यावर अभिजीत उत्तर देत म्हणतो की "म्हणजे एक पाय चिखलात टाकला आता दुसरा पण परत चिखलात टाकतोय". वर्षाताई आणि अभिजीतला बोलताना बघून अरबाज निक्कीला सांगतो. त्यावर ती म्हणते, "आता मी आणि अभिजीत विरुद्ध खेळत आहोत. तुला त्याला काय बोलायचंय ते बोल. मी त्याला स्माइल वगैरे देत असेल. पण, ते ठिके".
दरम्यान, यंदाच्या आठवड्यातील कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे.