"मी घराची महाराणी आहे", निक्कीने जान्हवीला डिवचलं अन् वैभवची काढली औकात, अभिनेता म्हणाला- "तुझी मस्ती मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:20 IST2024-08-27T13:20:08+5:302024-08-27T13:20:46+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. आणि या भांडणात वैभव चव्हाणने उडी घेतली आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.

"मी घराची महाराणी आहे", निक्कीने जान्हवीला डिवचलं अन् वैभवची काढली औकात, अभिनेता म्हणाला- "तुझी मस्ती मी..."
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीच्या टीम A मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्कीसमोर टीम A ची पोलखोल केल्यानंतर आता त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. आणि या भांडणात वैभव चव्हाणने उडी घेतली आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये निक्की "मी या घराची महाराणी आहे" असं जान्हवीला म्हणत आहे. त्यावर जान्हवी म्हणते, "तुझ्यात नौकराणी होण्याची पण क्षमता नाही". त्यानंतर निक्की वैभवला "वैभवची कॅप्टन होण्याची पण औकात नाही" असं म्हणते. हे ऐकल्यानंतर वैभवचा पारा चढतो. "ऐ नासके, बास कर. थोबाड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ", असं वैभवने निक्कीला म्हटल्यानंतर निक्की पुन्हा भडकते. ती वैभवला म्हणते, "ए बच्चू चल, गप भुसनळ्या". त्यानंतर वैभव रागाच्या भरात धावून जात असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे.
दरम्यान, पुरषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले यांच्यानंतर गेल्या आठवड्यात इरिना रुडाकोव्हा हिचा घरातील प्रवास संपला. आता यंदाच्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होणार? आणि कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार, हे पाहावं लागेल.