बिग बॉसने घेतली जान्हवीची फिरकी, निक्कीसाठी बनवायला सांगितला चहा, अभिनेत्री म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:05 IST2024-09-04T11:32:20+5:302024-09-04T12:05:19+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी असणाऱ्या निक्की आणि जान्हवी आता मात्र घरात दुश्मन असल्यासारख्या वागत आहेत. निक्की आणि जान्हवीची बिग बॉसनेही फिरकी घेतली आहे.

बिग बॉसने घेतली जान्हवीची फिरकी, निक्कीसाठी बनवायला सांगितला चहा, अभिनेत्री म्हणते...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर चर्चेत आहेत. निक्की आणि जान्हवीमध्ये सीझनच्या सुरुवातीलाच घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. पण, त्यानंतर मात्र भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीसमोर टीम A ची पोलखोल केली. त्यामुळे निक्की आणि जान्हवीच्या मैत्रीतही फूट पडल्याचं पाहायला मिळालं. एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी असणाऱ्या निक्की आणि जान्हवी आता मात्र घरात दुश्मन असल्यासारख्या वागत आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये निक्की आणि जान्हवीची बिग बॉस फिरकी घेताना दिसत आहेत. निक्कीला बिग बॉस विचारतात, "निक्की तुम्हाला चहा हवाय का?". त्यावर निक्की हो असं उत्तर देते. त्यानंतर किचनमध्ये चहा बनवत असलेल्या जान्हवीला बिग बॉस "निक्की यांच्यासाठी एक कप चहा वाढवाल का?" असं म्हणत तिची फिरकी घेतात.
त्यावर जान्हवी म्हणते, "नाही बिग बॉस...पण, तुमचा आदेश असेन तर मी करेन. ते पण फक्त तुमच्यासाठी...". त्यावर बिग बॉस जान्हवीला "मग माझ्यासाठी वाढवाल का? मला चहा प्यावासा वाटत आहे" असं विचारतात. जान्हवी उत्तर देत म्हणते, "ओके बिग बॉस तुमच्यासाठी...फक्त निक्कीचा चहा बनवताना थोडी अक्कल किसून घालू शकते का मी?".
दरम्यान, यंदाच्या आठवड्यातील कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे.