"ते मला पाचव्या सीझनमध्ये बोलवणारच!", 'बिग बॉस मराठी'बाबत अभिजीत बिचुकलेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 11:50 IST2024-08-22T11:47:14+5:302024-08-22T11:50:07+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेण्याबाबत अभिजीत बिचुकलेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

"ते मला पाचव्या सीझनमध्ये बोलवणारच!", 'बिग बॉस मराठी'बाबत अभिजीत बिचुकलेंचा मोठा दावा
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचं नवं पर्व खऱ्या अर्थाने खास ठरलं आहे. या सीझनमध्ये होस्टपासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक आश्चर्याचे धक्के चाहत्यांना मिळाले. आता बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून कोण येणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत सोशल मीडियावर काही नावांची चर्चाही रंगली आहे. राखी सावंत, हिंदुस्थानी भाऊ यांच्याबरोबरच अभिजीत बिचुकलेंच्या नावाचीही चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेण्याबाबत अभिजीत बिचुकलेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
अभिजीत बिचुकलेंनी नुकतंच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, "बिग बॉस मराठीचा पहिला सीझन कोणालाही माहीत नव्हता. म्हणूनच दुसऱ्या सीझनमध्ये मला बोलवलं. आणि आजही बिग बॉसचे ३,४ आणि ५ सीझन झाले. तरीही अभिजीत बिचुकलेशिवाय बिग बॉस मराठी चालणार नाही. पाचव्या सीझनमध्येही ते मला १ लाख टक्के बोलवतीलच". अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. या सीझनमधील ते सर्वाधिक चर्चेत राहिलेले सदस्य होते. त्याबरोबरच ते बिग बॉस १५ मध्येही सहभागी झाले होते. हिंदी बिग बॉसचं घरही त्यांनी दणाणून सोडलं होतं.
दरम्यान, बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू झाला असून दिवसेंदिवस हा खेळ अधिक रंजक होत चालला आहे. योगिता चव्हाणबरोबर निखिल दामलेचाही बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. सुरुवातीला कॅप्टन्सी कार्य जिंकून अरबाज यंदाच्या आठवड्याचा कॅप्टन झाला होता. पण, बिग बॉसने खेळात मोठा ट्विस्ट आणल्याने अरबाजने निक्कीला घराचा कॅप्टन बनवलं आहे.