Bigg Boss Marathi 5 : अभिजित, पॅडी भाऊ आणि अंकीता यांच्यामध्ये झाली वर्षां ताईंबद्दल चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 16:42 IST2024-09-17T16:42:17+5:302024-09-17T16:42:57+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या भागात सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल चर्चा करताना दिसून येतात. या आठवड्यात घरात जंगल राज आहे. काल पार पडकलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सर्वच सदस्य १००% देताना दिसून येणार आहेत.

Bigg Boss Marathi 5 : अभिजित, पॅडी भाऊ आणि अंकीता यांच्यामध्ये झाली वर्षां ताईंबद्दल चर्चा
‘बिग बॉस मराठी’(Bigg Boss Marathi Season 5)च्या भागात सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल चर्चा करताना दिसून येतात. या आठवड्यात घरात जंगल राज आहे. काल पार पडकलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सर्वच सदस्य १००% देताना दिसून येणार आहेत. आजच्या 'अनसीन अनदेखा'मध्ये तुम्ही पाहू शकता की, पॅडी भाऊ, अंकीता आणि अभिजीत हे गार्डन एरियात वर्षा ताईं विषयी बोलताना दिसत आहेत.
अभिजित म्हणाला की, सकाळी मी आणि पॅडी भाऊ आम्ही दोघांनी बाथरूम साफ करण्याचे ठरवले. मी मेल साफ करीन तर भाऊ फिमेल. तर फिमेल बाथरूममध्ये केसांचा गुंता असतो तर वर्षा ताई आधी म्हणाल्या होत्या की,हो बरोबर ज्याचे केस आहेत त्यांनी हे काढलेच पहिजे. वर्षा ताई जेव्हा आंघोळ करून बाहेर आल्या तेव्हा मी आता गेलो आणि पाहिले तर तिकडे केस होते. मी पॅडी भाऊंनी सांगितले की, केस आहेत. तर भाऊ मला म्हणाले. की जा तू आणि बोल त्यांना. मी गेलो आणि ताईंना म्हणालो ताई तिकडे केस आहेत. तर ताई म्हणाल्या,केस धुतले पण मी केस बांधले आहेत. माझे नाही ते. तर मी म्हणालो, अजून घरात कोणी अंघोळ नाही केली कोणाला विचारू मी..? ताई म्हणतात , " हो बरोबर आहे चूक झाली माझी.
''तरी त्या वाकड्यातच बोलणार..''
मग पॅडी भाऊ पुढे म्हणाले,मी आलो बाथरूममध्ये केस तिकडे होते. मी उचलेले ते केस आणि म्हणालो सगळ्यांना इथे आता केस आहेत ते मी आता उचलतो. पुढचा वेळी ज्याचे असतील त्याने उचलावे. यावर अंकीता म्हणाली,आपण त्यांच्यासोबत सरळ जरी बोललो तरी त्या वाकड्यातच बोलणार. पण ते खरे लागते मनाला खूप. आपल्याला त्यांचा मान ठेवून गप्प बसावे लागते.