Exclusive : -अन् ‘फाईटर’ योगेश जाधवला कोसळलं रडू..., ‘बिग बॉस मराठी 4’ बाहेर आल्यावर ऐकवली स्ट्रगल स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 15:14 IST2022-10-31T15:14:02+5:302022-10-31T15:14:43+5:30
Yogesh Jadhav Exclusive Interview : बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर योगेश जाधवने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत आईबद्दल बोलताना योगेशला रडू कोसळलं....

Exclusive : -अन् ‘फाईटर’ योगेश जाधवला कोसळलं रडू..., ‘बिग बॉस मराठी 4’ बाहेर आल्यावर ऐकवली स्ट्रगल स्टोरी
Yogesh Jadhav Exclusive Interview : ‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व (Bigg Boss Marathi 4)सध्या चांगलंच चर्चेत आहे. नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरातील तिसरं एलिमेशन पार पडलं. सर्वप्रथम निखिल राजेशिर्के बाहेर झाला. यानंतर मेघा घाडगे शोमधून बाद झाली आणि आता बिग बॉसच्या घरातून जेंटल जाईंट अशी ओळख असलेल्या योगेश जाधवला ( Yogesh Jadhav ) घराबाहेर पडावं लागलं. योगेश हा मार्शल आर्ट्स मध्ये पारंगत असून त्याने रोडीज शोमध्येही सहभाग नोंदवला होता. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर योगेश जाधवने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत आईबद्दल बोलताना योगेशला रडू कोसळलं.
आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल तो बोलला. मी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावचा. लहानपणापासून मी खूप संघर्ष केला आहे, असं तो म्हणाला.
दीड वर्षाचा असताना वडिलांनी सोडलं...
दीड वर्षांचा असताना वडिलांनी मला सोडलं. मी आणि आई आम्ही मामांकडे राहायला गेलो. माझ्या मामाने आणि माझ्या आईने मला काहीही कमी पडू दिलं नाही. माझ्या आईने मला वडिलांचं, भावाचं, बहिणीचं सर्वांचं प्रेम दिलं. मी एकटाच आहे. मला चार सावत्र बहिणी आहेत. आत्ता कधीकधी वडिलांसोबत बोलणं होतं. पण वडिलांसोबतचं एक नातं असतं ना, तसं आता काहीही नाहीये, असं योगेशने सांगितलं.
मामाचं स्वप्नं मी जगतोय...
माझं काहीही स्वप्नं नव्हतं. पण माझ्या मामाचं स्वप्नं होतं की मी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये जायचं. तुला एकदिवस जायचंय, असं मामा म्हणाले आणि त्यांचं स्वप्न मी जगतोय. लॉकडाऊनमुळे काही काळ मागे गेलो. पण मी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये असतो आणि जाणार, असंही योगेश म्हणालो.
माझी आई...
माझा एक मोठा अपघात झाला होता. चेहऱ्यावर 54 टाके पडलेले. पण ऑपरेशन होईपर्यंत आम्ही आईला सांगितलं नाही. मी शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांना माझा पहिला प्रश्न होता की, मी यापुढे बॉक्सिंग करू शकणार का? आईने मला यातून सावरायला खूप मदत केली. मी खचेल म्हणून ती माझ्यासमोर कधीच रडली नाही, हे सांगताना योगेश भावुक झाला. मी आज जो काही आहे तो माझ्या मम्मीमुळे... असं सांगताना त्याला रडू कोसळलं.