Bigg Boss Marathi 4 : 'माणसं समोर जे बोलतात ते खरं नसतं', असं का म्हणताहेत किरण माने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 17:03 IST2022-11-15T17:02:57+5:302022-11-15T17:03:55+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये किरण माने आणि विकास आता कधीच बोलणार नाही असे एकंदरीतच चित्र समोर आले होते. पण त्यांच्यातील अबोला आता संपला आहे

Bigg Boss Marathi 4 : 'माणसं समोर जे बोलतात ते खरं नसतं', असं का म्हणताहेत किरण माने
बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) रंजक वळणावर आला आहे. नुकतेच बिग बॉसच्या घरातून रुचिरा जाधव बाहेर पडली आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये किरण माने आणि विकास आता कधीच बोलणार नाही असे एकंदरीतच चित्र समोर आले होते. पण त्यांच्यातील अबोला आता मिटला असून ते विकासला आज पटवून देताना दिसणार आहेत… माणसं समोर जे बोलताता ते खरं नसतं .
किरण माने विकासला सांगणार आहेत, माणसं समोर बोलतात ते खरं नसतं. तू म्हणतोस समोर येऊन मला बोलतात... अक्षय काय म्हणाला होता टॉप ५ मध्ये तू आहेस आणि नंतर काय म्हणाला हा मला नको खेळायला. आज टॉयलेटच काढलं. समोर बोलतात तसे नसतात, तेच अपूर्वाचं पण आहे, गोड म्हसका लावते आहे कि नाही? विकास म्हणाला, माहिती आहे मला...गोड म्हसका लावून, तिला पण इग्नोर करायला तुम्हीच सांगितलं ना मी इग्नोर करतो आहे... ती टास्कमध्ये पूर्ण मला म्हसका लावते. मी इग्नोर करायला लागलो आहे.
किरण म्हणाले, हेच मला हवं होतो. दहा वेळा तू टाळल्यावर ११ वेळा येईल का तुझ्याकडे ? तू अक्षय बरोबर बोल, अमृता देशमुख बरोबर बोल, प्रसाद बरोबर बोल, रोहित बरोबर बोल, जी माणसं आपल्याला तोडायला निघाली आहे त्यांच्यासोबत बोलू नकोस. पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनिवारी व रविवारी रात्री ९.३० वाजता पाहावे लागेल.