Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 10:44 AM2023-01-08T10:44:39+5:302023-01-08T10:45:11+5:30

Bigg Boss Marathi 4: आज मिळणार बिग बॉसला त्याचा चौथ्या सिझनचा विजेता; 'हे' आहेत दावेदार

Bigg Boss Marathi 4 who will be the winner voting trend out | Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड?

Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार ‘बिग बॉस मराठी 4’ची ट्रॉफी? काय म्हणतो वोटिंग ट्रेंड?

googlenewsNext

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन अनेकार्थाने गाजला. नेहमीप्रमाणे यंदाच्या पर्वातही राडे रंगले, मैत्री बहरली, प्रेमाचे हळवे क्षणही या सीझनने अनुभवले. आता मात्र फिनालेची वेळ जवळ आली आहे. होय, काही तासांत ‘बिग बॉस मराठी 4’चा धमाकेदार फिनाले रंगणार आहे. या फिनालेमध्ये ‘बिग बॉस मराठी 4’चा विजेता अखेर कोण होणार? हे कळणार आहे.  बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हातात येणार हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत आणि आता वोटिंगचा ट्रेंड समोर आला आहे.

घरात उरले फक्त हे सदस्य...
‘बिग बॉस मराठी 4’च्या या शेवटच्या आठवड्यात मिड वीक एव्हिक्शन झालं. त्यामध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आलेला अभिनेता आरोह वेलणकर घरातून बाहेर पडला. तर याआधी रविवारी झालेल्या एलिमिनेशनमध्ये अभिनेता स्पर्धक प्रसाद जवादे घराबाहेर पडला होता. प्रसाद यंदाच्या सीजनचा एक स्ट्रॉंग स्पर्धक समजला जात होता, अनेकांनी त्याला फायनलमध्ये पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु तो बाहेर पडल्याने अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत यामध्ये अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंतचा समावेश आहे.

हा सदस्य वोटिंग ट्रेंडमध्ये पुढे...
‘बिग बॉस खबरी’ या इन्स्टा अकाउंटवर बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनमधील फायनल स्पर्धकांना मिळत असलेल्या वोट नुसार वोटिंग ट्रेंड शेअर करण्यात आला आहे. या ट्रेंडमध्ये किती तथ्य आहे, हे आम्ही दाव्यानिशी सांगू शकत नाही.   मात्र या पोस्टनुसार वोटिंग ट्रेंडमध्ये अभिनेता किरण माने पहिल्या क्रमांकावर आहेत. राखी सावंत दुसऱ्या स्थानावर, अपूर्व नेमळेकर तिसऱ्या क्रमांकावर, अमृता धोंगडे चौथ्या आणि अक्षय केळकर पाचव्या स्थानावर आहे. अर्थात विजेता नेमकं कोण होणार? हे आज कळेलच. 
 

Web Title: Bigg Boss Marathi 4 who will be the winner voting trend out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.