Bigg Boss Marathi 4 : अरे तू काय आहेस मला सांग ना तू...; किरण मानेंवर बरसले मांजरेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 12:08 IST2022-10-30T12:03:00+5:302022-10-30T12:08:25+5:30
Bigg Boss Marathi 4 : मांजरेकरांचा पारा चांगलाच चढला... त्यांनी किरण मानेंना थेट बॅग उचलून घराबाहेर काढण्याची ताकीदच दिली....

Bigg Boss Marathi 4 : अरे तू काय आहेस मला सांग ना तू...; किरण मानेंवर बरसले मांजरेकर
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या चांगलंच गाजतंय. पहिल्या दिवशीपासूनव या शोमध्ये राडे सुरू झालेत आणि ते थांबायची चिन्ह नाहीत. उलट दिवसेंदिवस त्यात वाढ होणार आहे. अर्थात दर आठवड्यात रंगणाऱ्या चावडीवर स्पर्धकांना आपल्या चुकीच्या वागण्याचा हिशेब द्यावा लागतोच. कालच बिग बॉस मराठीची चौथी चावडी पार पडली आणि यावेळी महेश मांजरेकरांनी ( Mahesh Manjrekar ) एकेकाची चांगलीच खरडपट्टी काढली. किरण माने (Kiran Mane) यांच्यावर मांजरेकर चांगलेच बरसले.
गेल्या आठवड्यात किरण माने यांनी थेट महेश मांजरेकरांवर टीका केली होती. ते कुणाला काम देतात, कुणाला ठरवून ओरडतात शिवाय इतर स्पर्धक कशासाठी आले आहेत, त्यांची लायकी काय? यावर किरण माने बोलले होते. हे पाहून मांजरेकरांचा पारा चांगलाच चढला त्यांनी किरण मानेंना थेट बॅग उचलून घराबाहेर काढण्याची ताकीदच दिली.
याचा एक प्रोमो समोर आला आहे. यात मांजरेकर किरण मानेंना झाप झाप झापताना दिसत आहेत. माने मी सगळं बघतो इथून, हे सगळे खेळायला आलेत ...पर्सनल दुश्मनी नाही इथे कुणाची... मी काय त्यांच्यावर रोल फेकतो. कुणाची लायकी काढतोस? अरे तू काय आहेस मला सांग ना तू...बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला... असं मांजरेकर म्हणतात.
याआधीही मांजरेकरांनी माने यांची कानउघडणी केली होती.
माझ्या बोलण्याचं भांडवल करू नका, असंही महेश मांजरेकरांनी सदस्यांना ठणकावून सांगितलं. मागच्या आठवड्यात मेघा घाडगेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आता या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाईल हे देखील कळणार आहे. त्याचबरोबर जाताना मेघा घाडगेने 'किरण मानेंपासून दूर राहा' असा सूचक सल्ला स्पर्धकांना दिला होता. आता या चावडीवर किरण माने मांजेकरांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या आठवड्यात नक्की काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.