Bigg Boss Marathi 4 : कानफाडित द्यायला हवी होती मी तुला...- किरण माने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:44 IST2022-11-14T17:43:46+5:302022-11-14T17:44:45+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी ४ चा शो रंजक वळणावर आला आहे.

Bigg Boss Marathi 4 : कानफाडित द्यायला हवी होती मी तुला...- किरण माने
बिग बॉस मराठी ४ (Bigg Boss Marathi 4) चा शो रंजक वळणावर आला आहे. घरात कधी सदस्यात वाद होतात कधी मैत्रीचे बंध फुलतात, कधी जुन्या आठवणीत कुणी रंगून जातं तर कुणी भविष्याच्या प्लॅन्सविषयी खुलासा करताना दिसत आहेत. आता हळूहळू प्रेक्षकांनाही सदस्यांचा खरा स्वभाव समजू लागला आहे. दरम्यान आता बिग बॉसच्या घरात काल पाचवं नॉमिनेशन झाले आणि रुचिरा जाधव (Ruchira Jadhav)ला कमी मतं पडल्यामुळे घराच्या बाहेर जावं लागलं आहे. कालच्या भागामध्ये विकासने किरण माने यांना गद्दार म्हणून टॅग दिला आणि त्यांनतर किरण माने यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
किरण माने यांनी विकासला देखील हे बोलून दाखविले. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ते विकासला सांगत आहेत, "खेळायला कोणी शिकवल तुला बिग बॉस? कोण कुत्र विचारात नव्हत तेव्हा कोणी विचारलं तुला ? त्यावर विकास म्हणाला, तुम्हीचं...
किरण माने म्हणाले, हे सांगायला काय जीभ जड झाली तुझी ? कानफडीत द्यायला हवी होती मी तुला ... माझा आता संबंध संपला ... काल झाल्या प्रकारानंतर किरण माने यांनी तोडले विकासशी संबंध ! ही मैत्री पुन्हा पहिल्या सारखी होऊ शकेल ? किरण माने विकासला माफ करतील ? हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी पाहावे लागेल.