Bigg Boss Marathi 4 Promo : ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात होतेय पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 14:32 IST2022-10-30T14:32:14+5:302022-10-30T14:32:48+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन चांगलाच रंगात आला आहे. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. आता वेळ आलीये ती पहिल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची.

Bigg Boss Marathi 4 Promo : ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात होतेय पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?
Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीचा चौथा सीझन चांगलाच रंगात आला आहे. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. आता वेळ आलीये ती पहिल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची. होय, आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. याचा प्रोमो रिलीज झाला आहे.
एक नवीन चेहरा बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार आहे. प्रामोमध्ये एक अभिनेत्री थिरकताना दिसतेय. तिचा चेहरा दिसत नाही. पण बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारी ही अभिनेत्री कोण? यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. नेटकऱ्यांनी अंदाज बांधणं सुरू केलं आहे. अनेकांच्या मते, ही अभिनेत्री ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील सोनाली अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये (Aishwarya Shetye) आहे.
ऐश्वर्या नुकतीच ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून बाहेर पडली होती. तिने बिग बॉस मराठी या शोसाठीच मालिका सोडल्याची चर्चा आहे. आता प्रेक्षकांचा हा अंदाज किती खरा ठरतो, ते कळेलच. शिवाय या नव्या एन्ट्रीमुळे बिग बॉसच्या घरातील समीकरणं कशी बदलतात, हेही बघायला मिळणार.
बिग बॉस मराठी 4 मध्ये अभिनेता किरण माने, अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, प्रसाद जवादे , त्रिशूल मराठे, यशश्री मसूरकर, योगेश जाधव हे स्पर्धक चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात एकूण 16 स्पर्धक सहभागी झाले होते. दोन आठवड्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्के शोमधून बाद झाला. यानंतरच्या आठवड्यात अभिनेत्री मेघा घाडगे घराबाहेर पडली. त्यानंतर आज आणखी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. मात्र सोबत एक वाईल्ड कार्ड एन्ट्रीही होणार आहे. एक सदस्य बाहेर पडताच आज बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.