"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:07 IST2024-08-07T14:07:20+5:302024-08-07T14:07:48+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव हा अरबाजची कॉपी असल्याचं रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर म्हटलं होतं. आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने वैभव आणि अरबाजबाबत एक पोस्ट केली आहे.

"वैभवला अरबाजसाठी वाघनखं घेऊन पाठवलं होतं, पण...", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची पोस्ट
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी ५' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. रोज खेळाडूंची नवी समीकरणं दिसत असली तरी घरात पहिल्या दिवसापासूनच वैभव चव्हाण, अरबाज पटेल यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. वैभव, अरबाज, जान्हवी आणि निक्की यांचा ग्रुप पहिल्याच दिवसापासून बनला आहे. कॅप्टन्सी टास्कमध्येही ते एकमेकांना सपोर्ट करताना दिसले. वैभव हा अरबाजची कॉपी असल्याचं रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर म्हटलं होतं. आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने वैभव आणि अरबाजबाबत एक पोस्ट केली आहे.
त्याचं झालं असं कॅप्टन्सी कार्यात दोन्ही इंजिनच्या डब्यात कोण बसलं? याचा अंतिम निर्णय वर्षा उसगावकर यांना द्यायचा होता. त्यांनी अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत यांची नावं घेतली. अभिजीतबरोबर अरबाजही तिथे बसलेला होता. त्यामुळे अभिजीत नव्हे तर अरबाज बसला आहे, असं जान्हवी, निक्की आणि वैभव वर्षा ताईंना ओरडून सांगत होते. पण, वर्षा उसगावकरांनी त्यांचा निर्णय बदलला नाही. त्यामुळे नंतर यावरुन वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अरबाजने त्याच्या बाजूने निर्णय न दिल्याने आकांडतांडव केला. तर जान्हवीबरोबर वैभवही वर्षा ताईंना "तुम्ही अनफेअर खेळलात" असं म्हणत होता. बिग बॉसच्या घरातील हाच व्हिडिओ बिग बॉस फेम जय दुधाणेने त्याच्या इन्स्टास्टोरीला शेअर केला आहे.
"वैभव चव्हाणला त्या शेंबड्या अरबाजसाठी वापरायला वाघनखं घेऊन पाठवलं होतं. पण, भाई आपला घरीच विसरून आला", असं जय दुधाणेने म्हटलं आहे. या टास्कदरम्यानचाच आणखी एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ही पोस्ट त्याने अरबाजला उद्देशून केली आहे. "२ मिनिटांआधी बोलला की आता मी तुम्हाला दाखवतो गेम काय...आता कॅप्टन्सीसाठी भीक मागतोय", असं म्हणत त्याने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.
दरम्यान, या दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील पहिलं कॅप्टन्सी कार्य पार पडलं आहे. या कॅप्टन्सी कार्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी ५चा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे.