Bigg boss marathi 3: 'विशाल overconfident आहे'; जयचं गॉसिपिंग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 00:45 IST2021-12-15T00:45:00+5:302021-12-15T00:45:00+5:30
Bigg boss marathi 3: अलिकडेच घरात एक टास्क पार पडला. या टास्कविषयी जय, मीरा आणि उत्कर्ष चर्चा करतांना दिसत आहे. यात जय, विशालवर टीकास्त्र डागणार आहे.

Bigg boss marathi 3: 'विशाल overconfident आहे'; जयचं गॉसिपिंग सुरु
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी (Bigg boss marathi). गेल्या २ महिन्यांपासून सुरु असलेला हा शो आता ग्रँड फिनालेच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. आता या घरात शेवटचे ७ स्पर्धक राहिले असून प्रत्येकामध्येच जोरदार चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच घरातील गॉसिपिंगलाही जोर आला आहे. नुकतंच घरात विशाल निकमविषयी (vishal nikam) गॉसिपिंग केलं जाणार आहे. यात तो ओव्हर कॉन्फिटंन्ट आहे, असं मत जय (jay dudhane) मांडणार आहे.
अलिकडेच घरात एक टास्क पार पडला. या टास्कविषयी जय, मीरा आणि उत्कर्ष चर्चा करतांना दिसत आहे. या तिघांच्या चर्चेचा एक प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
“विशालने मला overconfident चा टॅग दिला होता. पण काल तो ज्या पद्धतीने बोलत होता. त्यावरुन तोच जास्त overconfident असल्याचं दिसून आलं. तो सतत एकच गोष्ट बोलत होता. ती म्हणजे, मी २५ लाख deserve करतो, ते २५ लाख माझे..यालाच overconfident म्हणतात. तो बोलत होताना मीच इथे सगळ्यात भारी आहे. बाकी कोणीच नाही,असं जय, उत्कर्ष आणि मीराला सांगतो. त्यावर मीरा व उत्कर्षही त्यांचं मत मांडतात.
''as a player he is good, पण एक व्यक्ती जर निबंध चांगला लिहितो आणि बाकीच काहीचं नाही तर काय अर्थ त्याला. तुझ्यातला असा कोणता गुण आहे, मास्टरमाइंड... तुम्ही असले प्रश्न टाकल्यावर आम्ही क्लीन बोल्ड होऊ ना?", असं उत्कर्ष म्हणतो.
दरम्यान, आता या तिघांमधील चर्चा कोणत्या थरापर्यत जाणार?हे तिघं नेमका कोणता निर्णय घेणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. तसंच टास्कमध्ये सोनाली जोकर झाली असून तिने मीरासोबत 'क्रेझी किया रे' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्यामुळे जय, उत्कर्ष आणि मीराच्या गॉसिपिंगसोबतच सोनालीच्या डान्सचीही सगळीकडे चर्चा रंगली आहे.