‘Bigg Boss Marathi 3’वर मीम्सचा पाऊस, हे नाही पाहिलं तर काय पाहिलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:21 IST2021-10-08T18:11:43+5:302021-10-08T18:21:08+5:30
Bigg Boss Marathi 3 Funny Memes: ‘बिग बॉस मराठी 3’चे हे भन्नाट मीम्स पाहून पोट धरून हसाल...

‘Bigg Boss Marathi 3’वर मीम्सचा पाऊस, हे नाही पाहिलं तर काय पाहिलं?
‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) चांगलाच गाजतोय. कधी वाद, कधी मनोरंजक टास्क, कधी गप्पा अन् कधी चिमटे असा मस्त खेळ सुरू आहे. आता अशात सोशल मीडियावर या शोची चर्चा होणार नाही तर नवल. सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी 3’ची चांगलीच चर्चा आहे. होय, सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी 3’वरचे भन्नाट मीम्स (Bigg Boss Marathi 3 Funny Memes) व्हायरल होत आहेत. साहजिकच एकीकडे टीव्हीवरचे एपिसोड आणि दुसरीकडे सोशल मीडियावरचे एकापेक्षा एक भारी मीम्स असे दुहेरी मनोरंजन सध्या सुरू आहे.
मीम्सच्या दुनियेत सर्वाधिक चर्चेत आहे तो घरातील सदस्य जय दुधाणे (Jay Dudhane). होय, याला कारण आहे, नुकताच त्याने केलेला एक खुलासा. होय, नुकताच जयने त्याच्या पूर्वायुुष्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला होता. त्यावरून नेटकरी त्याची चांगलीच मजा घेत आहेत. मला पाच गर्लफ्रेंड्स होत्या असा खुलासा जय दुधाणेने केला होता. चक्क सहावी- सातवीला असताना मला एक गर्लफ्रेंड होती असं देखील त्यानं म्हटलं आहे. त्याच्यावरचेच मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
एका टास्कदरम्यान जयच्या अंगावर पांढरा रंग उडाला होता. त्यावरूनही नेटकऱ्यांनी मिम्स बनवत जयची खिल्ली उडवली आहे.
मीनल साप आहे साप, असं घरातील सदस्य बोलताना दिसले होते, यावरचं मीमही भन्नाट आहे.
चावडीवर महेश मांजरेकरांनी गायत्री आणि मीराची शाळा घेतली. यावरचं एक मीमही मस्त व्हायरल होतंय.
जय विशालला बैल म्हणाला, मग नेटकऱ्यांनी त्याचा ‘गुबुगुबु’चा नंदीबैल बनवला.
टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरात राडा झाला अन् त्यावरचेही मीम तयार झाले.
मी पण शेतातून आले, असं मीरा म्हणाली आणि नेटकऱ्यांनी तिचीही फिरकी घेतली.