Video: अवधूत गुप्तेच्या गाण्यावर सोनाली पाटीलने केला जबरदस्त डान्स; एक्स्प्रेशन्समुळे जिंकली चाहत्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 13:30 IST2021-12-28T13:30:00+5:302021-12-28T13:30:00+5:30
Sonali patil: 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगत असताना सोनालीने तिच्या ड्रेसिंग रुममध्ये एक व्हिडीओ शूट केला.

Video: अवधूत गुप्तेच्या गाण्यावर सोनाली पाटीलने केला जबरदस्त डान्स; एक्स्प्रेशन्समुळे जिंकली चाहत्यांची मनं
'वैजू नंबर १' (vaiju number 1), 'देवमाणूस' (devmanus) अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे चर्चेत येणाऱ्या सोनालीला खरी ओळख 'बिग बॉस मराठी ३' (bigg boss marathi 3) या रिअॅलिटी शोमुळे मिळाली. अलिकडेच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. या कार्यक्रमात तिसऱ्या पर्वात सहभागी झालेले सगळे कलाकार उपस्थित होते. मात्र, या सगळ्यांमध्ये सोनालीने तिच्या लूकमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाही तर सेटवरुन तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगत असताना सोनालीने तिच्या ड्रेसिंग रुममध्ये एक व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये ती पांडू चित्रपटातील बुरुम बुरुम, या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
"आपल्या @avadhoot_gupte मर्दाच गाणं हाय आणं मी ह्या रील नाय करणार व्हय? कोण तयार हाय माझ्या बुलेटवर 'बुरुम बुरुम' करायले कमेंट मध्ये सांगा बिगीबिगी!, " असं कॅप्शन सोनालीने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान,या व्हिडीओमध्ये सोनालीने जे एक्स्प्रेशन्स दिले आहेत. ते पाहून असंख्य चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. यात खासकरुन अवधूत गुप्ते, सोनाली कुलकर्णी यांनी कमेंट केल्या आहेत.