तृप्ती देसाईंनंतर Bigg Boss Marathi 3 च्या 'या' स्पर्धकाला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 13:56 IST2022-01-11T13:55:32+5:302022-01-11T13:56:06+5:30
यापूर्वी Bigg Boss Marathi 3 च्या स्पर्धक तृप्ती देसाई यांनाही झाली होती करोनाची लागण.

तृप्ती देसाईंनंतर Bigg Boss Marathi 3 च्या 'या' स्पर्धकाला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती
जवळपास दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनासारख्या असाध्य विषाणूसोबत (Coronavirus) लढा देत आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत (Celebrities) अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. पुन्हा एकदा आता कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. योग्य ती काळजी घेतल्यानंतरही अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामध्येच आता 'बिग बॉस मराठी 3' (Bigg Boss Marathi 3 ) मधील आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या सदस्यानं सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
बिग बॉस मराठी ३ मधील स्पर्धक आदिश वैद्य (Adish Vaidya) याला कोरोनाची लागण झाली आहे. आदिशनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून (Social Media Instagram) यासंदर्भात माहिती दिली आहे. "मला सकाळपासून थोडा कफ आणि सर्दीचा त्रास होत होता. सोमवारी मी कोरोनाची चाचणी केली होती. आज सकाळी चाचणीचा रिपोर्ट मिळाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांना जर लक्षणं दिसली तर कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. लवकरच बरा होईन," असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तृप्ती देसाईंनाही कोरोनाची लागण
अखेर "कोरोनाने" मला गाठलचं- माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी. परंतु, नियमांचे पालन मी करीत होते....जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा, असं तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली होती.