कॅन्सरने होत्याचं नव्हतं झालं! 'बिग बॉस' मध्ये एन्ट्री घेतली अन् दोन दिवसांतच माघारी परतली; बाहेर येताच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:35 IST2025-08-21T17:27:42+5:302025-08-21T17:35:23+5:30

'बिग बॉस' मध्ये एन्ट्री घेतली अन् दोन दिवसांतच माघारी परतली; बाहेर येताच मृत्यूने कवटाळलंं 

bigg boss hindi season 2 fame jade goody got survivel cancer as enter in house know about her | कॅन्सरने होत्याचं नव्हतं झालं! 'बिग बॉस' मध्ये एन्ट्री घेतली अन् दोन दिवसांतच माघारी परतली; बाहेर येताच मृत्यू

कॅन्सरने होत्याचं नव्हतं झालं! 'बिग बॉस' मध्ये एन्ट्री घेतली अन् दोन दिवसांतच माघारी परतली; बाहेर येताच मृत्यू

Bigg Boss Hindi Season 2 : टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस. लवकरच 'बिग बॉस हिंदी'चं १९ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन देखील अभिनेता सलमान खान करणार आहे. याचदरम्यान, अनेकांना जुन्या गोष्टी आठवत आहेत. अशीच एक मनाला चटका लावणारी गोष्ट 'बिग बॉस' हिंदींच्या सुरुवातीच्या पर्वात घडली होती. दरम्यान, काही परदेशी सौंदर्यवतीदेखील बिग बॉसच्या घरात येऊन गेल्या आहेत. अशातच या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये एका परदेशी स्पर्धकाने शोमध्ये भाग घेतला. पण, तिचा आनंद फार काळ टिकला नाही.

बिग बॉस हिंदीच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिवंगत ब्रिटिश अभिनेत्री जेड गुडी देखील सहभागी झाली होती. या शोपूर्वी ती बिग ब्रदरचाही भाग होती. या शोमधील तिचे आणि शिल्पा शेट्टीचा वाद चर्चेचा विषय ठरला होता.'बिग बॉस दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर, तिला गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचं आढळलं आणि ती शेवटची स्टेज होती. घरात एन्ट्री केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ती भारत सोडून ब्रिटनला माघारी परतली. या गंभीर आजाराने होत्याचं नव्हतं झालं.२२ मार्च २००९ रोजी तिने जगाचा निरोप घेतला.

बिग बॉस हिंदी या रियॅलिटी शो नेहमीच वैविध्यपूर्ण गोष्टींमुळे चर्चेत असतो. या शो च्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींना लोकप्रियता मिळाली. 'बिग बॉस १९ सुरू होण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळते आहे.

Web Title: bigg boss hindi season 2 fame jade goody got survivel cancer as enter in house know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.