१० लाखांत एक LPG सिलेंडर विकतोय 'हा' अभिनेता? पोस्ट व्हायरल, म्हणाला- "बॉलिवूडपेक्षा जास्त कमाई..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:10 IST2026-03-13T15:07:06+5:302026-03-13T15:10:06+5:30
सध्या भारतात एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतीत झालेली वाढ आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशा गंभीर परिस्थितीत 'बिग बॉस १५' फेम अभिनेत्याची एक सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

१० लाखांत एक LPG सिलेंडर विकतोय 'हा' अभिनेता? पोस्ट व्हायरल, म्हणाला- "बॉलिवूडपेक्षा जास्त कमाई..."
सध्या भारतात एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतीत झालेली वाढ आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत 'बिग बॉस १५' फेम राजीव अदातिया याची एक सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
राजीव अदातियाची 'ती' व्हायरल पोस्ट
राजीव अदातियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक गॅस सिलेंडरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजीवने गंमतीने लिहिले की, "मी असा निर्णय घेतला आहे की, सध्या बॉलिवूडपेक्षा गॅस विकण्यात जास्त पैसा आहे. एक सिलेंडर १० लाख रुपयांना आहे! माझ्या रोजच्या कमाईपेक्षा ही खूप खूपच चांगली गोष्ट आहे. ही तर सोन्याची खाण आहे."
काय आहे सत्य?
राजीव खरोखरच गॅस सिलेंडर विकत नाहीये. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात इंधनाचे दर वाढत आहेत. याशिवाय गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील या ज्वलंत मुद्द्यावर उपरोधिक टोला लगावण्यासाठी राजीवने ही पोस्ट केली होती.
राजीवच्या या विनोदी पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी हसण्याचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अली गोनीने विचारले, "मला हिरव्या रंगाचा सिलेंडर मिळेल का?" तर टीना दत्ता, झरीन खान आणि राहुल शर्मा यांनीही राजीवच्या या 'ह्युमर'चे कौतुक केले आहे. काही युजर्सनी तर गमतीने त्याच्याकडे एक-दोन सिलेंडरची मागणीही केली आहे. राजीव अदातिया हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो 'खतरों के खिलाडी १२' आणि 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही दिसला आहे.