शिव आजही आहे वीणाच्या प्रेमात? 'या' कारणामुळे अजूनही हटवला नाही तिच्या नावाचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:20 IST2023-05-17T16:20:00+5:302023-05-17T16:20:00+5:30
Shiv thakare: बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान शिवने त्याच्या हातावर वीणाच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता. एकेकाळी प्रेमाचं प्रतिक म्हणून या टॅटूकडे पाहिलं जात होतं.

शिव आजही आहे वीणाच्या प्रेमात? 'या' कारणामुळे अजूनही हटवला नाही तिच्या नावाचा टॅटू
'बिग बॉस मराठी' (bigg boss marathi) या गाजलेल्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून चर्चेत आलेली जोडी म्हणजे शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि विणा जगताप (veena jagtap). बिग बॉसच्या घरात या दोघांच्या नात्याची विशेष चर्चा रंगली. इतंकच नाही तर हा शो संपल्यानंतरही ते एकमेकांना डेट करत होते. परंतु, काही कारणास्तव ते विभक्त झाले. मात्र, आजही त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. यात सध्या शिवच्या हातावर असलेल्या वीणाच्या नावाची चर्चा रंगली आहे.
बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान शिवने त्याच्या हातावर वीणाच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता. एकेकाळी प्रेमाचं प्रतिक म्हणून या टॅटूकडे पाहिलं जात होतं. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतरही त्याने तो टॅटू अद्यापही काढलेला नाही. त्यामुळे या टॅटूची वारंवार चर्चा होते. यावर अलिकडेच शिवने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हा टॅटू काढण्याविषयी भाष्य केलं.
"मी जे केलंय ते मला चांगलंच ठावूक आहे. ती व्यक्ती योग्य होती याची मला खात्री आहे. आता आम्ही वेगळे झालोय. पण, त्यावेळी ज्या गोष्टी घडल्या त्या त्या काळात योग्य होत्या", असं शिव म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "माझ्यासाठी ती व्यक्ती योग्य होती. त्यामुळे मला हे लपवण्याची किंवा काढून टाकण्याची गरज वाटत नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा कोणी येईल आणि त्या व्यक्तीला जर हे आवडलं नाही किंवा वाईट वाटलं तरच मी हा टॅटू काढेन. मला आता तरी त्याची काही अडचण वाटत नाही. मला ते खूपतही नाही. मला त्या व्यक्तीप्रती खूप आदर आहे. मग मी ते का लपवू.''
दरम्यान, बिग बॉस मराठीनंतर शिवने त्याच्या करिअरमध्ये मोठी झेप घेतली आहे. अलिकडेच तो हिंदी बिग बॉसमध्ये झळकला होता. त्यानंतर आता तो रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमात दिसून येत आहे.