Bigg Boss 9:चा विजेता Prince Narula 'या' अभिनेत्रीसह अडकणार लग्नबंधनात, समोर आले Pre-wedding Photoshoot
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 19:00 IST2018-10-06T13:21:00+5:302018-10-06T19:00:00+5:30
आपल्या जोडीदारासह काही खास क्षण कॅमे-यात कैद करुन प्री-वेडिंग फोटो शूट केलं जाते. प्रिंसनेसुद्धा आपल्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Bigg Boss 9:चा विजेता Prince Narula 'या' अभिनेत्रीसह अडकणार लग्नबंधनात, समोर आले Pre-wedding Photoshoot
एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर आहे. असंच काहीसं या दोघांच्या बाबतीत घडलं. बिग बॉस 9 सिझनमध्ये प्रिंसची युविकासह भेट झाली होती. बिग बॉसच्या घरातच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. या शोनंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. युविका चौधरी ही टीव्ही अभिनेत्री असून प्रिंस नरूलाहा बिग बॉस 9 सिझनमध्ये स्पर्धक म्हणून झळकला होता.
काही वर्षे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. त्यांच्या या नात्याला नवीन ओळख द्यायची वेळ आली आहे. त्यानुसार 11 ऑक्टोबरला पंजाबी पारंपरिक पद्धतीनुसार हा लग्नसोहळा पार पडणार असून 12 ऑक्टोबरला चंदिगढ येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. दोघांनी याच वर्षी जानेवारीमध्ये साखरपूडा केला होता. खुद्द प्रिंसनेही सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही गुड न्युज दिली होती.
सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. आपल्या जोडीदारासह काही खास क्षण कॅमे-यात कैद करुन प्री-वेडिंग फोटो शूट केलं जाते. प्रिंसनेसुद्धा आपल्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत प्रिंस आणि युविका दोघांचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याच्या प्री-वेडिंग फोटोशूट अल्बमला सोशल मीडियावर रसिकांची पसंती लाभते आहे. त्याचे चाहते, मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु आहे.
लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता युविकाची झाली आहे.तर दुसरीकडे प्रिंसची काही वेगळी अवस्था नाही. प्रिंसने तर युविकाच्या नावाचा टॅटूही काढला आहे.लग्नासाठी आम्ही दोघंही एक्सायटेड आहेत.