Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री घेताच स्टार क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण भिडली 'या' स्पर्धकाशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:00 IST2025-10-05T15:00:25+5:302025-10-05T15:00:59+5:30
Wild Card म्हणून Bigg Boss 19च्या घरात येताच स्टार क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीनं 'या' स्पर्धकाशी घेतली दुश्मनी!

Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री घेताच स्टार क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण भिडली 'या' स्पर्धकाशी!
Bigg Boss 19 Wild Card: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९'चं (Bigg Boss 19) यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास आहे. या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा आतापर्यंत एक वेगवेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. आतापर्यंत घरातून आवेज दरबार, नगमा मिराजकर, नतालिया हे तीन सदस्य बेघर झाले, तर अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा याची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. 'बिग बॉस १९' मध्ये दर आठवड्याला काही ना काही नवीन ट्विस्ट येत असतात. आता एक नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. स्टार क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर ही दुसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार घरात शिरताच तिनं एका स्पर्धकाशी पंगा घेतला आहे.
अलीकडेच, समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की सलमान खानने दीपक चहरला स्टेजवर बोलावले. त्यामुळे तो वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश करत असल्याचं बोललं गेलं. पण, प्रत्यक्षात त्याची बहीण, अभिनेत्री आणि मॉडेल मालती चहर ही बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना दिसणार आहे. मालतीने घरात प्रवेश करताच मोठा तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
तान्या मित्तलसोबत थेट पंगा
'बिग बॉस तक'च्या वृत्तानुसार, मालती चहर घरात प्रवेश करताच स्पर्धक अमाल मलिकच्या जवळ येत आहे. अमालसोबत मालतीची ही जवळीक तान्या मित्तलला थोडी असुरक्षित वाटू लागली आहे. या दोघींमधील कोल्ड वॉरचा त्यांच्या नात्यावर कसा परिणाम होतो, हे आगामी एपिसोड्समध्येच स्पष्ट होईल.
वीकेंड का वारमध्ये एल्विश यादवचा तडका
दरम्यान, वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना आणखी ड्रामा पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक एल्विश यादव या कार्यक्रमात सहभागी होणार असून, तो तान्या मित्तल आणि इतर सदस्यांना प्रश्नांच्या माध्यमातून सळो की पळो करून सोडणार आहे. यामुळे तान्या अधिक अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. मालतीच्या एन्ट्रीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धा आणि नाट्यमयता आणखी वाढणार हे निश्चित आहे.