Bigg Boss 19: 'बिग बॉस'चा पहिला स्पर्धक कन्फर्म! इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींपेक्षाही जास्त फॉलोवर्स, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:27 IST2025-08-08T15:27:06+5:302025-08-08T15:27:28+5:30
'बिग बॉस १९'चा पहिला स्पर्धक कन्फर्म झाला असून त्याचं नावही समोर आलं आहे.

Bigg Boss 19: 'बिग बॉस'चा पहिला स्पर्धक कन्फर्म! इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींपेक्षाही जास्त फॉलोवर्स, कोण आहे तो?
Bigg Boss 19: 'बिग बॉस'चं नवं पर्व काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १९'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. अनेक सेलिब्रिटींची काही नावंही समोर आली आहेत. पण, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. आता 'बिग बॉस १९'चा पहिला स्पर्धक कन्फर्म झाला असून त्याचं नावही समोर आलं आहे.
यंदा 'बिग बॉस १९'च्या घरात प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एन्ट्री होणार आहे. ज्याचे इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे पुरव झा आहे. 'बिग बॉस'चे अपडेट्स देणाऱ्या एका सोशल मीडिया पेजवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. पण, अद्याप पुरव झा किंवा बिग बॉसच्या टीमकडून याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. अजूनही 'बिग बॉस १९'मधील स्पर्धकांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
कोण आहे पुरव झा?
पुरव झा हा लोकप्रिय युट्यूबर आणि सोशल मीडिया कंटेट क्रिएटर आहे. १२वीत असतानाच त्याने सोशल मीडियावर एन्ट्री घेतली होती. टिकटॉकवर व्हिडीओ बनवून त्याने प्रसिद्धी मिळवली. सध्या तो इन्स्टाग्राम आणि युट्यूबर सक्रिय आहे. त्याच्या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात. एखाद्या सेलिब्रिटीचेही नसतील एवढे ७ मिलियन फॉलोवर्स पुरव झाचे आहेत. तर युट्यूबवर त्याचे ४९ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.