Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत होणार डबल एविक्शन? 'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:22 IST2025-10-25T12:16:35+5:302025-10-25T12:22:09+5:30
'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन होणार असून घरातील चर्चेत असलेल्या दोन स्पर्धकांचा खेळातील प्रवास संपल्याचं सांगण्यात येत आहे

Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत होणार डबल एविक्शन? 'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला
सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) मध्ये या आठवड्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. या सिझनमध्ये सतत होणारे 'नो-एव्हिक्शन' पाहिल्यानंतर, आता निर्मात्यांनी थेट डबल एव्हिक्शन करण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. 'वीकेंड का वार'मध्ये एक नव्हे तर दोन स्पर्धकांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचं सांगण्यात येत आहे. जाणून घ्या सविस्तर
कोण गेलं घराबाहेर?
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते, ते म्हणजे गौरव खन्ना, प्रणित मोरे, नेहल चुडासमा, बसीर अली. बिग बॉस तक या पेजने दिलेल्या अपडेटनुसार प्रेक्षकांकडून सर्वात कमी मतं नेहल चुडासमा हिला मिळाली आहेत. त्यामुळे नेहलचे घराबाहेर जाणं, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. याशिवाय डबल एव्हिक्शनमध्ये, बसीर अलीला देखील घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, अशी जोरदार चर्चा आहे. बसीर अली हा शोमध्ये निष्पक्ष गेम खेळणारा स्पर्धक मानला जातो, पण कमी मतं मिळाल्याने बसीरला बाहेर पडावं लागण्याची शक्यता आहे.
🚨 Nehal Chudasama and Baseer Ali have been EVICTED from Bigg Boss 19 house.
— BBTak (@BiggBoss_Tak) October 25, 2025
No SECRET Room Drama, last minute they canceled. Both are officially OUT of the show.
Shocking decision or Happy?
दुसरीकडे, बसीर अलीच्या टीमकडून ही एक्झिटची बातमी खोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. बसीर सुरक्षित असून तो अजूनही शोचा भाग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान कोणाला बाहेर काढतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वीकेंड का वारमध्ये नीलमची शाळा!
एव्हिक्शन व्यतिरिक्त, या आठवड्यात 'वीकेंड का वार'मध्ये अभिनेत्री नीलम गिरीची सलमान खान शाळा घेणार आहे. नीलमने तान्या मित्तलविरुद्ध जो आक्रमक पवित्रा घेतला होता, त्याबद्दल सलमान तिची कानउघाडणी करणार आहे. तसेच मृदुल तिवारीलाही सलमानचा ओरडा ऐकावा लागणार आहे. याशिवाय रिपोर्टनुसार, मृदुल तिवारी बिग बॉसचा नवीन कॅप्टन झाल्याचं सांगण्यात येत आहे.