Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:30 IST2025-11-11T16:27:37+5:302025-11-11T16:30:59+5:30
'बिग बॉस १९' या शोमधून मिड वीक एविक्शनमध्ये घरातील एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे हा स्पर्धक?

Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर?
रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) च्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शोमधून मिड वीक एविक्शनमध्ये घरातील एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या मतानुसार मृदुल तिवारीला (Mridul Tiwari) 'बिग बॉस'चं घर सोडावं लागणार असल्याची बातमी समोर येतेय. जाणून घ्या सविस्तर
लाईव्ह प्रेक्षकांनी घेतला निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस'च्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे एलिमिनेशन झाले आहे, जिथे अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रेक्षक उपस्थित होते. 'वीकेंड का वार'मधील नियमित नॉमिनेशन प्रक्रियेची वाट न पाहता, अचानक झालेल्या या मिड-वीक एव्हिक्शनमुळे घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. एलिमिनेशनसाठी निवडलेल्या सदस्यांमध्ये मृदुल तिवारीचा समावेश होता. लाईव्ह ऑडियन्सने दिलेल्या मतांनुसार मृदुल तिवारीला कमी वोट मिळाल्याने तत्काळ घर सोडावं लागलं. या निर्णयामुळे मृदुलचा 'बिग बॉस १९' मधील प्रवास अचानक संपुष्टात आला आहे. आता खरंच असं घडलं का? हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल.
मृदुल तिवारीने 'बिग बॉस १९'च्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले. तो अनेकवेळा घरातील वादविवादांमध्ये सहभागी झाला, तर काहीवेळा त्याने शांत राहून आपली मतं मांडली. मात्र लाईव्ह प्रेक्षकांच्या मनात मृदुलने स्थान निर्माण न केल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं आहे. या अनपेक्षित एक्झिटमुळे 'बिग बॉस १९'मध्ये आता मोठा ट्विस्ट अँड टर्न आला आहे. याशिवाय ७ डिसेंबरला 'बिग बॉस १९'ची ग्रँड फिनाले रंगणार असल्याची चर्चा आहे