Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:44 IST2025-10-03T12:44:34+5:302025-10-03T12:44:52+5:30
'बिग बॉस १९'मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, यंदा सीझनमध्ये होणाऱ्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे प्रेक्षकांसोबतच घरातील सदस्यांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
Bigg Boss 19: 'बिग बॉस' या रिएलिटी शोचं यंदाचं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस १९' सुरू होऊन एक महिना होऊन गेला आहे. आता शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीची प्रेक्षका वाट बघत आहेत. 'बिग बॉस १९'मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, यंदा सीझनमध्ये होणाऱ्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे प्रेक्षकांसोबतच घरातील सदस्यांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
'बिग बॉस १९'च्या घरात क्रिकेटरच्या बहिणीची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. भारतीय क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहर 'बिग बॉस १९'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जातं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मालती चहरला बिग बॉसच्या टीमकडून वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी विचारणा झाली असून दीपक चहर स्वत: त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी 'बिग बॉस १९'च्या घरात येणार आहे. मात्र, अद्याप यावर 'बिग बॉस १९'च्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे 'बिग बॉस १९'मध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
कोण आहे मालती चहर?
मालती चहर ही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका आहे. ती मॉडेलिंगही करते. अनेक ब्युटी पेजेंट्स स्पर्धेत मालती सहभागीही झाली होती. मिस इंडिया अर्थ २००९ हा खिताब तिच्या नावावर आहे. तर फेमिना मिस इंडिया २०१४ ची ती उपविजेती होती. मालती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे १ मिलियन फॉलोवर्स आहेत. मालतीने 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेतली तर घरातील समीकरणं पुन्हा बदलताना दिसतील.