वडिलांच्या वयाचा होता दिग्दर्शक! कामाच्या बहाण्याने बोलावलं अन्; क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालतीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:46 IST2025-12-18T10:43:14+5:302025-12-18T10:46:35+5:30
ग्लॅमरच्या या जगात काम करताना चांगले अनुभव येतीलच असं नाही. अनेक नवख्या कलाकारांना इंडस्ट्रीत काम करताना चांगल्या-वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो.

वडिलांच्या वयाचा होता दिग्दर्शक! कामाच्या बहाण्याने बोलावलं अन्; क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालतीचा धक्कादायक खुलासा
Malti Chahar: बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री अनेकदा कास्टिंग काऊचच्या घटना समोर येत असतात. आतापर्यंत अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. असाच काहीसा विचित्र अनुभव क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहरला आला होता. बिग बॉस १९ मध्ये झळकलेली अभिनेत्री मालती चहर एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचबाबत वक्तव्य केलं आहे.
अलिकडेच मालती चहरने'सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली.बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मालती चहरने घरातील तिच्या प्रवासाविषयी आणि इंडस्ट्रीमधील तिच्या प्रवासाविषयी सांगितले.त्याचबरोबर तिच्याबरोबर घडलेला एक प्रसंग देखील सांगितला. तेव्हा ती म्हणाली, "हा, मला सुद्धा काही विचित्र अनुभव आले आहेत.मी माझ्या वडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं होतं. एक-दोन लोकांनी चान्स मारला असेल पण कोणीही मर्यादा ओलांडली नाही. इंडस्ट्रीत खूप स्मार्ट लोक आहेत. ते लगेच तुमचा स्वभाव ओळखतात. एका-दोघांनी फ्लर्ट केलं. काही जण चुकीचे वागले. पण त्यातील काही लोक हे समजूतरदार होते. सगळेच लोक वाईट असं असतात असंही मी म्हणणार नाही. ते तुमच्या बॉडी लॅंग्वेंजवरून तुमचा स्वभाव कसा आहे हे ओळखतात. माझे वडील हवाई दलात होते त्यामुळे, मी जेव्हा इतरांशी बोलते तेव्हा त्यांना ते दिसून येतं."
प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलेलं गैरवर्तन...
यावेळी मालती तो वाईट अनुभव शेअर करताना म्हणाली की, एका प्रोजेक्टच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शकाने तिला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. ते तिच्या वडिलांच्या वयाचे होते. कामाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असताना त्यावेळी त्या दिग्दर्शकाने जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मालती म्हणाली,"मी सुन्न झाले. मला समजलंच नाही की माझ्यासोबत काय घडलं. मी तिथेच त्या माणसाला सुनावलं आणि तिथून निघून आले. तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्या घटनेनंतर मला कळलं की इथे कोण कोणाचं नसतं. मला वाटलंच नव्हतं की माझ्या वडिलांच्या वयाचा असलेला तो माणूस माझ्याशी असं वागेल. त्यावेळी मला प्रचंड राग आला होता."