Bigg Boss 19: "माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होतेय...", कोकण हार्टेड गर्लचं चाहत्यांना मोठं सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:20 IST2025-09-07T18:19:45+5:302025-09-07T18:20:12+5:30
'बिग बॉस १९'च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती. अशातच आता 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Bigg Boss 19: "माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होतेय...", कोकण हार्टेड गर्लचं चाहत्यांना मोठं सरप्राइज
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. हे पर्व सुरू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. आता 'बिग बॉस १९'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. वीकेंड का वारमध्ये शहनाज गिल येणार असून ती सोबत वाइल्ड कार्ड एन्ट्रीही घेऊन येणार असल्याचा प्रोमो समोर आला होता. तेव्हापासूनच 'बिग बॉस १९'च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.
अशातच आता 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती म्हणते, "बिग बॉस हिंदीच्या घरात माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होतेय. मी या प्रवासासाठी खूप उत्साही आहे. 'बिग बॉस मराठी'च्या वेळी मी 'बिग बॉस' पाहिलं नव्हतं. पण, आता माझ्याकडे अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना तुम्ही मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले. असेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. हेच प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफी...". आणि तेवढ्यातच अंकिताला तिचा नवरा कुणाल झोपेतून उठवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
सुरुवातीला अंकिताचा व्हिडीओ पाहून ती खरंच 'बिग बॉस १९'च्या घरात वाइल्ड कार्ड घेणार असल्याचं चाहत्यांना वाटलं होतं. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकताही वाढली होती. पण, नंतर हा प्रँक असल्याचं समोर आल्याने चाहते थोडेसे नाराज झाले आहेत. अंकिताच्या या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला 'बिग बॉस १९'च्या घरात बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.