"हे यश तुमचं...", 'बिग बॉस १८' जिंकल्यानंतर करणवीर मेहराची खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:12 IST2025-01-20T11:09:46+5:302025-01-20T11:12:40+5:30

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनविश्वात 'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) च्या पर्वाबद्दल जोरदार चर्चा सुरु होती.

bigg boss 18 karanveer mehra post for fans after winning show shared special photo with mother and sister on social media | "हे यश तुमचं...", 'बिग बॉस १८' जिंकल्यानंतर करणवीर मेहराची खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

"हे यश तुमचं...", 'बिग बॉस १८' जिंकल्यानंतर करणवीर मेहराची खास पोस्ट; चाहत्यांचे मानले आभार

Karanveer Mehra Post: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनविश्वात 'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) व्या पर्वाबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. अखेर मोठ्या दिमाखात या पर्वाचा ग्रॅंड फिनाले पार पडला. या पर्वातील सदस्य करणवीर मेहराने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. करणवीर मेहरा (Karanveer Mehra) जिंकल्यानंतर त्याचे चाहतेदेखील प्रचंड आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून करणवीर मेहराला शुभेच्छा देत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, ट्रॉफी जिंकल्यानंतर करणवीर मेहराने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 


'बिग बॉस १८' चा विजेता होताच करणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 'बिग बॉस'ची ट्राफी हातात घेऊन नुकताच त्याने आपल्या आई आणि बहिणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मेहरा कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसतो आहे. करणवीरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहीलंय, "ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलाच. जनतेचा लाडका अर्थात करणवीर मेहराने 'बिग बॉस १८' चा शो जिंकला आहे.  'बिग बॉस १८' चा खरा हिरो! त्याने दिलेलं वचन पाळलं आहे. ट्रॉफीसह तो परत आला आहे. एक तटस्थ प्रेक्षक काय असतो याची ताकद तुम्ही सर्वांनी दाखवून दिली. #KVMNation आणि #KaranKeVeeron, हे यश तुमचंच आहे."

पुढे करणवीरने लिहलंय की, "दुसरी ट्रॉफीदेखील आता घरी आली आहे आणि ती अशीच कायम चमकत राहील,  आता खऱ्या अर्थाने सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे." अशा आशयाची पोस्ट करणीवीरने शेअर केली आहे. 

'बिग बॉस १८'ची ट्रॉफी जिंकण्याआधी करणवीर मेहरा 'खतरों के खिलाडी १४'चा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने 'बिग बॉस १८'च्या ट्रॉफीवरही नाव कोरलं. 'बिग बॉस' आणि खतरों के खिलाडी अशा दोन रिएलिटी शोचे विजेतेपद मिळवणारा करणवीर मेहरा दुसरा अभिनेता आहे.

Web Title: bigg boss 18 karanveer mehra post for fans after winning show shared special photo with mother and sister on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.