'बिग बॉस १७'ची ट्रॉफी गमावल्यानंतर विकीची अंकितासाठी पोस्ट, म्हणतो - तू प्रत्येक गोष्टीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 17:08 IST2024-01-29T17:07:20+5:302024-01-29T17:08:22+5:30

"तू लोखंडे आणि जैन कुटुंबीयांना...", 'बिग बॉस १७'च्या फिनालेनंतर विकीची अंकितासाठी पोस्ट

bigg boss 17 vicky jain wrote special post for ankita lokhande said you proud jain and lokhande family | 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी गमावल्यानंतर विकीची अंकितासाठी पोस्ट, म्हणतो - तू प्रत्येक गोष्टीत...

'बिग बॉस १७'ची ट्रॉफी गमावल्यानंतर विकीची अंकितासाठी पोस्ट, म्हणतो - तू प्रत्येक गोष्टीत...

बहुचर्चित 'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेल्या अंकिताने 'बिग बॉस १७'च्या टॉप ५मध्ये स्थान मिळवलं होतं. पण, अंकिताला हा शो जिंकता आला नाही. 'बिग बॉस'च्या ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या अंकिताला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 'बिग बॉस'च्या फिनालेनंतर विकी जैनने अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

अंकिताबरोबर तिचा पती विकी जैननेही 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली होती. 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी विकी एक होता. पण, फिनालेपूर्वीच विकीला 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे अंकिताकडून त्याच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आता विकीने अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 'बिग बॉस १७'च्या फिनालेमधील काही फोटो विकीने त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. " जैन आणि लोखंडे कुटुंबीयांना तुझा गर्व आहे अंकिता. तू ज्या पद्धतीने हा खेळ खेळलास, कधीच हार मानली नाहीस...प्रत्येक गोष्टीत तू तुझं बेस्ट दिलंस. तुझे चाहते, मित्रमैत्रिणी सगळ्यांना तुझा अभिमान असेल," असं विकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. विकीच्या या पोस्टवर अंकिताच्या चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

दरम्यान, 'बिग बॉस १७' संपताच विकी जैनला मोठ्या रिएलिटी शोची ऑफर मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विकी 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा 'बिग बॉस'ची ट्रॉफी नावावर करण्याची संधी मिळणार आहे. 

Web Title: bigg boss 17 vicky jain wrote special post for ankita lokhande said you proud jain and lokhande family