नवीन वर्षात 'बिग बॉस 17'मध्ये मोठा ट्विस्ट! दोन स्पर्धकांना सलमानने दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:08 IST2024-01-01T13:07:14+5:302024-01-01T13:08:06+5:30

यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

Bigg Boss 17 SHOCKING Double Eviction: Neil Bhatt, Rinku Singh Walk Out of Salman Khan's Show | नवीन वर्षात 'बिग बॉस 17'मध्ये मोठा ट्विस्ट! दोन स्पर्धकांना सलमानने दाखवला बाहेरचा रस्ता

नवीन वर्षात 'बिग बॉस 17'मध्ये मोठा ट्विस्ट! दोन स्पर्धकांना सलमानने दाखवला बाहेरचा रस्ता

'बिग बॉस 17' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता नवीन वर्षात 'बिग बॉस 17'मध्ये  स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे. 'बिग बॉस 17' वीकेंडचा वारमध्ये डबल नॉमिनेशन झालं आणि दोन स्पर्धकांना सलमान खानने बाहेरचा रस्ता दाखवला. 

 'बिग बॉस 17'च्या घरात काल रात्री पहिले डबल एविक्शन झाले. यावेळी सलमान खानने तगडे स्पर्धक असलेले नील भट्ट आणि रिंकू धवन यांची नावे घेत सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का दिला. नील भट्ट आणि रिंकू धवन यांना घरातून बाहेर काढण्यात आले. या आठवड्यात नील भट्ट, रिंकू धवन, आयशा खान आणि अभिषेक कुमार वीकेंड का वार मध्ये नॉमिनेट झाले होते. 

घरातून बाहेर पडल्यानंतर नील भट्टने डीएनए न्यूज पोर्टलशी संवाद साधला. यावेळी त्याने विकी, अंकिता, ईशा आणि समर्थ यांची नावे त्याने सर्वात वाईट चार स्पर्धक म्हणून सांगितली. तर मुनव्वर आणि अभिषेक कुमार हे दोघे जर चांगले खेळले तर हे दोघे  टॉप-2 मध्ये पोहचू शकतात, असेही तो म्हणाला. तसेच  मुनव्वरचे वैयक्तिक आयुष्य टेलिव्हिजनवर दाखवणे योग्य नाही, असेही तो म्हणाला. 

'बिग बॉस 17'मध्ये काही सेलिब्रिटी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. तर सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, ओरी,  ईशा मालवीय, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, अनुराग डोवाल, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे स्पर्धक आहेत. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Bigg Boss 17 SHOCKING Double Eviction: Neil Bhatt, Rinku Singh Walk Out of Salman Khan's Show