Bigg Boss 16 : 'आई कसं वाटतंय, हे मराठी बिग बॉस नाही', सलमान खान आणि शिवच्या आईचे भावूक संभाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:23 PM2023-01-08T19:23:26+5:302023-01-08T19:24:58+5:30

शिव ठाकरेची आई बिग बॉसच्या घरात आली आहे. तिच्या साधेपणाने सर्वच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सलमान खानने तर तिच्याशी मराठीत गप्पा मारल्या आहेत.

bigg-boss-16-shiv-thackeray-mother-and-salman-khan-conversation-emotional-video | Bigg Boss 16 : 'आई कसं वाटतंय, हे मराठी बिग बॉस नाही', सलमान खान आणि शिवच्या आईचे भावूक संभाषण

Bigg Boss 16 : 'आई कसं वाटतंय, हे मराठी बिग बॉस नाही', सलमान खान आणि शिवच्या आईचे भावूक संभाषण

googlenewsNext

Bigg Boss 16 :  बिग बॉस १६ या हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरेची (Shiv Thackeray) चर्चा काही कमी नाही. सध्या यामध्ये फॅमिली विक सुरु आहे. दरम्यान स्पर्धकांच्या आई बिग बॉसच्या मंचावर आल्या आहेत आणि सलमान खान (Salman Khan) त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतोय. दरम्यान शिव ठाकरेची आईही घरात आली आहे. तिच्या साधेपणाने सर्वच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सलमान खानने तर तिच्याशी मराठीत गप्पा मारल्या आहेत. शिव ज्याप्रकारे नाव उंचावत आहे हे बघून तिला खूप अभिमान वाटतोय.

शिव ठाकरेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सलमान खान शिवच्या आईला विचारतो, 'आई, कसं वाटतंय तुम्हाला शिव ला इतकं चांगलं खेळताना पाहून ?'यावर त्याची आई म्हणते, 'हो सर शिव चांगला खेळतोय.' यावर सलमान म्हणतो, आता हे मराठी बिग बॉस नाही. आई म्हणते, 'तो सगळ्यांसोबत मिळूनमिसळून राहतो.' सलमान म्हणतो, 'तो सगळ्यांमधला मास्टरमाईंड आहे.'

शिवने 'मराठी बिग बॉस २' चा विजेता झालाच आणि आता तो हिंदी बिग बॉसमध्येही प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. आपला मुलगा इतकं छान खेळतोय हे बघून कोणत्याही आईचे डोळे भरुन येतील.  त्यात सलमान आणि शिवच्या आईचे हे संभाषण खरंच भावूक करणारे आहे.

Web Title: bigg-boss-16-shiv-thackeray-mother-and-salman-khan-conversation-emotional-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.