Bigg Boss 16 : आधी शालीन टीनावर बिथरला अन् मग सुरू झाला रोमान्स, पाहून चाहतेही कन्फ्युज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:05 PM2022-11-30T14:05:57+5:302022-11-30T14:06:20+5:30

Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या घरात नाती क्षणात कशी बदलतात, याचं एक ताजं उदाहरण पाहायचं असेल तर हे दोन व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवेत.

Bigg Boss 16: romance between shalin bhanot and tina datta | Bigg Boss 16 : आधी शालीन टीनावर बिथरला अन् मग सुरू झाला रोमान्स, पाहून चाहतेही कन्फ्युज

Bigg Boss 16 : आधी शालीन टीनावर बिथरला अन् मग सुरू झाला रोमान्स, पाहून चाहतेही कन्फ्युज

googlenewsNext

Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या घरात नाती क्षणात कशी बदलतात, याचं एक ताजं उदाहरण पाहायचं असेल तर हे दोन व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवेत. होय, टीना दत्ता आणि शालीन भनोट हे बिग बॉस 16 मधलं नवं नवं कपल. दोघंही कधी कधी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात तर कधी आम्ही फक्त मित्र आहोत म्हणून ओरडून ओरडून सांगताना दिसतात. पण यांचं प्रेम म्हणा की ‘प्रेमाचं नाटक’ यांना स्वस्थ बसू देत नाही...

मंगळवारच्या एपिसोडमध्ये शालीन टीनावर बिथरला. इतका की, घरातून बाहेर पडलो तर मी तुला फोनही करणार नाही, असं तो म्हणाला. इतकंच नाही तर तुझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला मी काही तुझा नोकर नाही, असंही रागाच्या भरात तो बोलून गेला. टीनाने आपली चूक कबुल करत, शालीनला शांत करण्याचा प्रयत्न केला पण शालीनचा राग काही शांत झाला नाही.

यानंतर काय तर पुन्हा शालीन व टीना एकत्र झालेत. घरात पुन्हा दोघांचा रोमान्स पाहायला मिळाला. कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टीना व शालीन ‘बिग बॉस’च्या घरात रोमॅन्टिक झालेले पाहायला मिळत आहेत.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये टीना व शालीन एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसले. यानंतर शालीनने टीनाला किसही केलं. ‘मी तुला आवडतो का?’ असं शालीन टीनाला विचारतो आणि त्याचा हा प्रश्न ऐकून टीना लाजते.

टीना व शालीनचं क्षणाक्षणाला बदलणारं हे नातं बघून चाहतेही कन्फ्युज झाले आहेत. दोघांत नेमकं काय सुरू आहे, हेच कळायला मार्ग नसल्याने  प्रेक्षकांनी दोघांना ट्रोलही केलं आहे.  शालीन व टीना केवळ प्रेमाचं नाटक करत असल्याचं प्रेक्षकांना वाटत आहे.

Web Title: Bigg Boss 16: romance between shalin bhanot and tina datta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.