Sumbul Touqeer Khan : ‘बिग बॉस 16’ फेम सुम्बुल तौकीरने खरेदी केलं नवं घर; नेटकरी म्हणाले, आता मंडलीचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 16:49 IST2023-02-26T16:48:23+5:302023-02-26T16:49:35+5:30

Sumbul Touqeer Khan : सुम्बुलने सोशल मीडियावर नव्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नवं घर. काम सुरू आहे, असं तिने म्हटलं आहे.

Bigg Boss 16 Fame Sumbul Touqeer Khan Bought New House In Mumbai | Sumbul Touqeer Khan : ‘बिग बॉस 16’ फेम सुम्बुल तौकीरने खरेदी केलं नवं घर; नेटकरी म्हणाले, आता मंडलीचा...

Sumbul Touqeer Khan : ‘बिग बॉस 16’ फेम सुम्बुल तौकीरने खरेदी केलं नवं घर; नेटकरी म्हणाले, आता मंडलीचा...

Sumbul Touqeer Khan : बिग बॉस १६ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या सुम्बुल तौकीर खानला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. बिग बॉसच्या ट्रॉफीनं तिला हुलकावणी दिली. पण प्रेक्षकांची मनं मात्र तिने जिंकलीत. शोनंतर सुम्बुलकडे अनेक मोठ्या ऑफर्स आहेत. आता तिने मुंबईमध्ये नवं घर घेतलं आहे. 
सुम्बुलने सोशल मीडियावर नव्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नवं घर. काम सुरू आहे, असं तिने म्हटलं आहे. शिवाय चाहत्यांकडून आपल्या नव्या घराचं इंटेरिअर कसं असावं याविषयी काही कल्पनाही मागवल्या आहेत.

सुम्बुलच्या या व्हिडीओनंतर चाहत्यांनी तिला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय काही चाहत्यांनी आपल्या कल्पनाही शेअर केल्या आहेत. यात काही सुम्बुलला डिवचणारेही आहेत. नवं घरं घेतलं ना मग, आता मंडलीचा एक फोटो लाव, अशा शब्दांत एका युजरने तिला डिवचलं आहे. सुम्बुल आता रडणार, रडण्यासाठीही एक वेगळी रूम बनव, अशा शब्दांत काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.  

१९ वर्षाच्या सुम्बुलने बिग बॉसच्या १६व्या सीझनमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. ती या शोमधील सर्वात लहान वयाची सदस्य होती. बिग बॉसच्या घरात असताना सुम्बुल अनेकदा नॉमिनेट झाली. मात्र प्रत्येकवेळी चाहत्यांच्या मतांच्या आधारावर ती बचावली. बिग बॉसच्या घरात ती १८ आठवडे राहिली. आता शोमधून बाहेर आल्यावर तिने कामाला सुरूवात केली आहे.  कुंडली भाग्य या मालिकेत ती झळकणार असल्याचं कळतंय. याशिवाय ओटीटी डेब्यूसाठीही ती तयार आहे. डियर इश्क या सीरिजमध्ये तिची वर्णी लागली आहे. 
  

Web Title: Bigg Boss 16 Fame Sumbul Touqeer Khan Bought New House In Mumbai