Bigg Boss 15 : पती भाड्यानं आणला आहेस का? अभिजीत बिचुकलेच्या प्रश्नानं चिडली राखी सावंत, चक्क उपटल्या त्याच्या झिंज्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 02:20 PM2021-12-07T14:20:32+5:302021-12-07T15:53:09+5:30

Bigg Boss 15 : होय, राखीच्या पतीवर बिचुकलेनं अशी काही कमेंट केली की, राखी भडकली. तिला राग अनावर झाला.

bigg boss 15 abhijeet bichukale told ritesh bhaade ka pati rakhi sawant fight video viral | Bigg Boss 15 : पती भाड्यानं आणला आहेस का? अभिजीत बिचुकलेच्या प्रश्नानं चिडली राखी सावंत, चक्क उपटल्या त्याच्या झिंज्या...

Bigg Boss 15 : पती भाड्यानं आणला आहेस का? अभिजीत बिचुकलेच्या प्रश्नानं चिडली राखी सावंत, चक्क उपटल्या त्याच्या झिंज्या...

googlenewsNext

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस’च्या घरात कशावरून राडा होणार, हे सांगता यायचं नाही. ‘बिग बॉस 15’मध्ये सध्या रोज नवे राडे सुरू आहेत. अभिजीत बिचुकले , रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी, राखी सावंत आणि तिचा पती रितेश असे पाच जण शोमध्ये आल्यापासून घरातलं वातावरण पेटलं आहे. आता काय तर राखी सावंत (Rakhi Sawant ) आणि अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale) यांच्यात जबरदस्त भांडण झालं. अगदी राखीनं रौद्रावतार धारण केला.

 ताज्या व्हिडीओत राखी व बिचुकले दोघे भांडताना दिसत आहेत. होय, राखीच्या पतीवर बिचुकलेनं अशी काही कमेंट केली की, राखी भडकली. तिला राग अनावर झाला. राखी, पती भाड्यानं आणला आहेस का? असा प्रश्न बिचुकले उठतो आणि राखीचा राग अनावर होतो. ती इतकी संतापते की, अगदी बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीची तोडफोड सुरू करत सुटते. बिचुकलेचे केस खेचताना दिसतेय. सलमान भाईने पण तुला हेच विचारलं होतं,असं बिचुकले म्हणतो. यावर, भाईने कधीच माझ्या पतीला भाड्याचा पती म्हटलं नाही.तू असशील भाड्याचा टट्टू, तुझी बायको असेल भाड्याची, असं राखी म्हणते.


  
बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तेव्हा बिग बॉसचा होस्ट सलमान खान यानेही राखीला तिच्या पतीबद्दल गमतीनं विचारलं होतं.  हा तुझा खरोखरचा पती आहे की तु कुठून त्याला घेऊन आलीस? असं सलमान म्हणाला होता. यावर नहीं...नहीं... भाई, ये सच में मेरा पती परमेश्वर है, असं राखी म्हणाली होती.  

ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत   लग्न झाल्याचं ओरडून ओरडून सांगत होती. पण तिच्यावर विश्वास ठेवायला कुणी तयार होईना. माझा नवरा एनआरआय असल्याचं राखी सांगत होती. पण तो कोण, कुठला, कसा दिसतो, हे कळायला मार्ग नव्हता. अशात राखीचा पती रितेश   पहिल्यांदा ‘बिग बॉस 15’च्या  मंचावर आला आणि केवळ एवढंच नाही तर वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून राखीसोबत त्यानं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. पण अद्यापही रितेश हा राखीचा पती आहे, कदाचित यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत.

Web Title: bigg boss 15 abhijeet bichukale told ritesh bhaade ka pati rakhi sawant fight video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.