Bigg Boss 11 : हिना खानने शिल्पा शिंदेच्या मराठी चाहत्यांची केली मिमिक्री, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 20:14 IST2018-01-07T14:43:44+5:302018-01-07T20:14:44+5:30

बिग बॉसचा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशात हा शो जिंकण्यासाठी शोमध्ये असलेले सर्वच सदस्य प्रयत्न करीत आहेत. ...

Bigg Boss 11: Hima Khan Shilpa Shinde's Marathi Fans Mimicri, Watch Video! | Bigg Boss 11 : हिना खानने शिल्पा शिंदेच्या मराठी चाहत्यांची केली मिमिक्री, पाहा व्हिडीओ!

Bigg Boss 11 : हिना खानने शिल्पा शिंदेच्या मराठी चाहत्यांची केली मिमिक्री, पाहा व्हिडीओ!

ग बॉसचा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशात हा शो जिंकण्यासाठी शोमध्ये असलेले सर्वच सदस्य प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शिल्पा शिंदे, हिना खान, लव त्यागी आणि विकास गुप्ता मुंबईतील एका मॉलमध्ये आपल्या चाहत्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी गेले होते. जेव्हा हे चारही स्पर्धक मॉलमध्ये पोहोचले तेव्हा शेकडो चाहत्यांनी त्यांना घेराव घातला. आपल्या फेव्हरेट स्पर्धकाला समोर बघून चाहते त्यांच्या नावाने अक्षरश: ओरडत होते. त्यातच शिल्पा शिंदेचे चाहते तर तिची झलक बघण्यासाठी आतुर झाले होते. पुढे जेव्हा हे चारही स्पर्धक बिग बॉसच्या घरात पोहोचले तेव्हा हिनाने शिल्पा शिंदेच्या चाहत्यांची खिल्ली उडविल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हिना त्या मराठी चाहत्यांची मिमिक्री करीत आहे, जे शिल्पा शिंदेचे चाहते होते. हे चाहते शिल्पाच्या नावाने कसे ओरडत होते, याची मिमिक्री हिना करीत असताना दिसत आहे. मिमिक्री करताना हिना विकासला सांगते की, ‘तू ते बघितले काय? छोट्या-छोट्या ग्रुपमधील काही चाहते सिल्पा-सिल्पा म्हणून तिच्या नावाने ओरडत होते.’ यावर विकास म्हणतो की, ‘ती महाराष्टÑीयन असून, तिच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे.’

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक शिल्पाला ट्रोल करीत आहेत. कोणी म्हणत आहे की, शिल्पा मराठी नाही तर कोणी म्हणत आहे की, ती मुंबईमध्ये कुठे राहते? पण काहीही असो, शिल्पा शिंदेचा प्रभाव पाहता हिना आणि विकास स्वत:ला असुरक्षित समजत असावेत. कारण बºयाच सेलिब्रिटींच्या मते, शिल्पा शिंदेच बिग बॉस ११ ची विनर असणार आहे. 

Web Title: Bigg Boss 11: Hima Khan Shilpa Shinde's Marathi Fans Mimicri, Watch Video!