Thipkyanchi Rangoli : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होतेय एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:46 IST2022-06-21T15:45:11+5:302022-06-21T15:46:43+5:30
Thipkyanchi Rangoli Marathi series: होय, मालिकेतील मानसी वहिनी म्हणजेच अभिनेत्री अमृता फडकेनंही नुकतीच मालिका सोडली. तिच्याजागी अभिनेत्री सई कल्याणकर मालिकेत मानसी वहिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होतेय.

Thipkyanchi Rangoli : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होतेय एन्ट्री
अनेक मराठी मालिका सध्या चर्चेत आहेत. या मालिकांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. स्टार प्रवाह ( Star Pravah) या मराठी वाहिनीवरची ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) ही अशीच एक मालिका. ही मालिका आली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. तेव्हापासून ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये कायम टॉप 10 मध्ये आहे. अप्पू आणि शशांकची केमिस्ट्री, कुक्की गँगची धम्माल असलेली कानिटकर कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. आता या मालिकेत एक नवं पात्र पाहायला मिळणार आहे. होय, मालिकेतील मानसी वहिनी म्हणजेच अभिनेत्री अमृता फडकेनंही नुकतीच मालिका सोडली. तिच्याजागी अभिनेत्री सई कल्याणकर मालिकेत मानसी वहिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होतेय. ही अभिनेत्री कोण तर ‘बिग बॉस मराठी’ फेम वीणा जगताप ( Veena Jagtap).
मालिकेच्या मागील काही भागात आपण पाहिलं की, दादा आणि माई यांच्यात वाद होतात. अवंतिका हे त्यांच्या वादाचं कारण असतं. माई आणि दादांचं भांडण अप्पू ऐकते आणि ती दादा काकाला सुनावते. याच अवंतिका पात्राची मालिकेत एंट्री होणार आहे. ही भूमिका वीणा जगताप जिवंत करणार आहे.
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत वीणा दादा माईची मुलगी अवंतिका हिची भूमिका साकारणार आहे. अवंतिकाच्या येण्यानं मालिकेत नव वळण पाहायला मिळणार हे नक्की. घरातील सगळ्या गोष्टी अप्पूला माहिती असतात. मात्र दादा काका आणि माईच्या आयुष्यातील अवंतिकाबद्दलच्या गोष्टी अप्पूला आतापर्यंत माहिती नाही.
वीणा अलीकडे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत रेवाच्या भूमिकेत दिसली होती. रेवाचा पार्ट संपल्यानं वीणाने आता ही मालिका सोडली आहे. त्यामुळे आता ती ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत झळकणार आहे.
‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणा जगतापनं टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसºया सीझनमध्ये दिसली होती. बिग बॉसच्या घरात वीणा चांगलीच चर्चेत आली होती.