बिग बॉस मराठी २ - टास्क सुरु असताना हीना आणि शिवमध्ये झाली बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 11:52 IST2019-06-27T11:50:18+5:302019-06-27T11:52:57+5:30
टास्कच्या सुरुवातीला शिव सिंहासनवर बसला आणि त्याचे संरक्षण रुपाली करणार असे शिवने सांगितले.

बिग बॉस मराठी २ - टास्क सुरु असताना हीना आणि शिवमध्ये झाली बाचाबाची
बिग बॉस मराठी मध्ये कालच्या भागामध्ये टिकेल तोच टिकेल हा टास्क बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावला. टीम A आणि टीम B अशा दोन टीम्समध्ये हा टास्क रंगणार आहे. काल सुरु झालेल्या या टास्कमध्ये सिंहासनावर बसलेल्या सदस्याला दुसऱ्या टीममधील सदस्याने बजर वाजण्याच्या आत उठवायचे आहे. टास्कच्या सुरुवातीला शिव सिंहासनवर बसला आणि त्याचे संरक्षण रुपाली करणार असे शिवने सांगितले. आता या टास्कमध्ये कोणती टीम जिंकेल? हे बघणे रंजक असणार आहे. याचबरोबर नॉमिनेशन टास्कवरून देखील घरामध्ये किशोरी, पराग, रुपाली आणि वीणा शिववर नाराज होते... आणि शिववर विश्वास ठेऊ शकत नाही असे म्हणणे पडले... वीणा आणि पराग मध्ये पुन्हाएकदा वादाची ठिणगी पडली.
आज टास्कमध्ये किशोरी शहाणे आणि पराग सिंहासनावर बसणार आहेत. विरुध्द टीम पराग आणि किशोरी यांना सिंहासनावरून उठवण्यासाठी बरेच प्रयत्न करणार आहेत. टास्क सुरु असताना हीना आणि शिवमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये शिव हीनाला म्हणाला “लेव्हल खाली पाडू नकोस हीना”. हिनाने असे काय केले कि शिवला राग अनावर झाला ? पराग आणि किशोरी यांनी देखील संचालिका असलेल्या सुरेखा ताईना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला कि बळाचा वापर होत आहे, असे नाही करू शकत तरीदेखील विरोधी टीम ऐकायला तयार नाही... पुढे टास्कमध्ये काय होईल ? हे बघणे रंजक असणार आहे.