भारती सिंहच्या नवऱ्याने हर्ष खरेदी केली Mercedes-Benz GLS; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 15:51 IST2024-03-30T15:39:59+5:302024-03-30T15:51:06+5:30
Haarsh limbachiyaa: हर्षने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या गाडीसोबतचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

भारती सिंहच्या नवऱ्याने हर्ष खरेदी केली Mercedes-Benz GLS; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
कॉमेडीक्वीन भारती सिंहने हिंदी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आज भारती अनेक शोचं सूत्रसंचालन करत असून यशस्वीरित्या युट्यूब चॅनेल आणि पॉडकास्टही सांभाळत आहे. गेल्या काही वर्षात तिने आणि पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी अथक मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. यामध्येच आता हर्षने Mercedes-Benz GLS ही नवीकोरी कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या गाडीची किंमत थक्क करणारी आहे.
हर्षने इन्स्टाग्रामवर या गाडीचा फोटो शेअर करत गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 'माझी नवीन गाडी..माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही', असं कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केले आहेत. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
किती आहे भारती- हर्षच्या नव्या कारची किंमत
हर्षने खरेदी केलेल्या Mercedes-Benz GLS या गाडीची किंमत १.५१ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं. सध्या भारती या नव्या कारसह कपिल शर्माच्या आगामी कार्यक्रमामुळेही चर्चेत येत आहे. द ग्रेट इंडियन कपिल शर्मा हा शो लवकरच सुरु होणार आहे. मात्र, या नव्या कार्यक्रमात भारती झळकणार नाहीये. त्यामुळे तिच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.