'भाग्य दिले तू मला' फेम कावेरीने शेअर केला No makeup look; फोटो पाहून चाहते झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 17:24 IST2024-04-04T17:24:21+5:302024-04-04T17:24:55+5:30
Tanvi mundale: तन्वीने पहिल्यांदाच तिचा विदाऊट मेकअप असलेला फोटो शेअर केला आहे.

'भाग्य दिले तू मला' फेम कावेरीने शेअर केला No makeup look; फोटो पाहून चाहते झाले थक्क
'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजत आहे. या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले (tanvi mundle) मुख्य भूमिका साकारत आहे. उत्तम अभिनयकौशल्य आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर तन्वीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिची चर्चा रंगत असते. यामध्येच आता तिच्या नो मेकअप लूकची चर्चा रंगली आहे.
तन्वीचा साधेपणा कायमच प्रेक्षकांना खुणावत असतो. त्यामुळे तिच्या सिंपल, सोज्वळपणाचं कौतुक सगळेच जण करत असतात. परंतु, यामध्येच तिने तिचा नो मेकअप लूकचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिचा हा लूक पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.
तन्वी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिने तिचा सिंपल लूकमधील फोटो शेअर केला असून ती विदाऊट मेकअपही तितकीच सुरेख दिसते. त्यामुळे तिच्या सौंदर्याचं सध्या नेटकरी कौतुक करत आहेत.
दरम्यान, 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत तन्वीने कावेरी ही मुख्य भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात लोकप्रिय झाली आहे.