ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:50 IST2025-04-30T13:49:55+5:302025-04-30T13:50:36+5:30

अविनाश नारकर लेकाविषयी म्हणाले...

avinash narkar and aishwarya narkar marathi couple reels know how their son reacts | ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."

ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."

मराठी कलाविश्वातली सुपरहिट जोडी अविनाश नारकर-ऐश्वर्या नारकर (Avinash Narkar-Aishwarya Narkar). गेल्या अनेक वर्षांपासून ते इंडस्ट्रीत आहे. विविध मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. खऱ्या आयु्ष्यातही यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. ट्रेडिंग रील्सही बनवतात. अनेकदा त्यांना रील्सवरुन ट्रोलही करण्यात येतं. नुकतंच त्यांनी रील्सवर लेकाची काय प्रतिक्रिया असते हे सांगितलं.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी सोशल मीडियावर रील्स पाहून लेकाची काय रिअॅक्शन असते असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "याबाबतीत अमेय न्युट्रल होता. कारण तेव्हा तो त्याच्याच आयुष्यात इतका व्यस्त होता. तसंही आम्ही आर्टिस्ट असल्यामुळे अभिनय हा आमचा पिंडच आहे. त्यामुळे त्याला असं काही वेगळं वाटलं नाही. मी जर साधी गृहिणी असते आणि अचानक मी असं काही तरी डान्स रील्स केले असते तर त्याला कदाचित वेगळं वाटलं असतं. महत्वाचं म्हणजे त्याचा कधीच आमच्या आयुष्यात हस्तक्षेप नसतो."

पुढे अविनाश नारकर म्हणाले, "आम्ही तिघंही कधीही एकमेकांच्या वैचारिक गोष्टीत दखल देत नाही. अजाणतेपणी आमच्याकडून ते होतं. अमुक ठिकाणी ऑडिशन आहे किंवा एखाद्या भूमिकेची ऑफर आहे तर त्यावर मी आणि ऐश्वर्या एकमेकांना जाऊ की नको असं अजिबात विचारत नाही. हा सर्वस्वी आमचा निर्णय असतो. फक्त चांगलं आहे की वाईट आहे याविषयी आम्ही बोलतो. त्यामुळे अमेयला सुद्धा तीच सवय लागली. तो आमच्या गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. आता तर अमेयही आम्हाला ट्रेंडिंग रील्स सुचवतो."

नारकर दाम्पत्याच्या लेकाचं नाव अमेय आहे. त्याने रुईया कॉलेजमधून बीएमएम केलं आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्याने एकांकिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. अमेयने 'खरा इन्स्पेक्टर मागावर' या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील ईशा अजय या अभिनेत्रीला अमेय अनेक वर्षांपासून डेट करत आहे.

Web Title: avinash narkar and aishwarya narkar marathi couple reels know how their son reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.