Asim Riaz : “सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 17:31 IST2023-02-26T17:29:48+5:302023-02-26T17:31:47+5:30

Asim Riaz shocking reaction: बिग बॉसचा १३ वा सीझन दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) जिंकला होता आणि आसिम या सीझनचा रनरअप होता.

asim riaz shocking reaction on bigg boss 13 winner sidharth shukla | Asim Riaz : “सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा

Asim Riaz : “सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा

Asim Riaz shocking reaction: टेलिव्हिजनचा सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉसचा १६ वा सीझन नुकताच संपला. रॅपर एमसी स्टॅन या शोचा विजेता ठरला. स्टॅनच्या विजयानंतर सोशल मीडियावर बिग बाॅस हा शो चांगलाच ट्रोल झाला होता. अनेकांनी एमसी स्टॅनच्या विजयावर नाराजी व्यक्त केली होती. बिग बॉस हा शो बायस्ड आहे, फिक्स्ड आहे, असा आरोप अनेकांनी केला होता. अशात आता बिग बॉस १३ चा उपविजेता आसिम रियाज (Asim Riaz) याने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
बिग बॉसचा १३ वा सीझन दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) जिंकला होता आणि आसिम या सीझनचा रनरअप होता. आता ३ वर्षांनंतर आसिम रियाजने यावर भाष्य करताना सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद ही फसवणूक होती असं म्हटलं आहे.

 सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आसिम रियाज यावर बोलला. तो म्हणाला, “सुरुवातीला मला बिग बॉससाठी रिजेक्ट करण्यात आलं होतं. मी या शोमध्ये यावं, अशी मेकर्सची इच्छा नव्हतीच. पण नंतर त्यांचं मन बदललं आणि त्यांनी मला बोलावलं. मी बिग बॉस हा शो हरलो. कारण मी जिंकावं अशी मुळातच मेकर्सची इच्छा नव्हती. आज आपण १५ मिनिटांसाठी वोटिग लाईन उघडतो आहोत, ज्यांना जिंकवायचं त्यांना जिंकवा, असं ते म्हणाले. अरे खरं सांगा ना, तुम्हाला मला जिंकूच द्यायचं नव्हतं.  त्यांनी माझी हार आधीच ठरवलेली होती. फक्त हे स्पष्टपणे सांगितलं नाही. ती निव्वळ फसवणूक होती.”

आसिमच्या या मुलाखतीची क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. अनेकांनी यावरून आसिमला ट्रोल केलं आहे. हा आजही आपला पराभव मान्य करू शकलेला नाही, असं एका युजरने म्हटलं. भावा, तु काहीही म्हटलं तरी सिद्धार्थ शुक्लाच बिग बॉसचा सर्वात पात्र विजेता होता. तेव्हा हार मान्य कर आणि पुढे जा, असा सल्ला अनेकांनी त्याला दिला.

आसिम रियाज बिग बॉस १३ मध्ये असताना त्याला देश विदेशातून  पाठिंबा मिळाला होता. अगदी जॉन सीनानेही त्याला समर्थन दिलं होतं. पण अंतिमक्षणी सिद्धार्थ शुक्ला शोचा विजेता ठरला. बिग बॉस १३मधून बाहेर पडल्यानंतर त्याने काही  म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. आगामी काळात तो कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉकअप २’मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: asim riaz shocking reaction on bigg boss 13 winner sidharth shukla