Video: डोळ्याखाली डार्क सर्कल अन् थकलेला चेहरा!अंकिता लोखंडेला विदाऊट मेकअप पाहिलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 14:52 IST2024-01-31T14:52:19+5:302024-01-31T14:52:43+5:30
Ankita lokhande: अंकिताला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Video: डोळ्याखाली डार्क सर्कल अन् थकलेला चेहरा!अंकिता लोखंडेला विदाऊट मेकअप पाहिलंय का?
बिग बॉस17 (bigg boss 17) मध्ये सहभागी झालेली अंकिता लोखंडे (Ankita lokhande) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. या शोमुळे तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर उघड झाल्या. बिग बॉसचं पर्व संपल्यानंतरही सुद्धा ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसत असून पहिल्यांदाच ती मेकअपशिवाय कॅमेरासमोर आली आहे. त्यामुळे अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अंकिताचा व्हिडीओ तिची मैत्रीण अशिता धवन हिने शेअर केला आहे. अंकिता बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्यापूर्वी तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी आणि कुटुंबियांनी तिला छान सरप्राइज दिलं होतं. यावेळी त्यांनी केकसुद्धा कापला होता. हा व्हिडीओ अशिताने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. तसंच अंकिताला विनामेकअपच पाहून चाहते हैराण झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता नो मेकअप लूकमध्ये दिसून येत आहे. यात ती प्रचंड थकलेली दिसत असून तिच्या डोळ्याखाली बरेच डार्क सर्कल असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अंकिताचा हा व्हिडीओ पाहिल्यावर एका युजरने 'भयानक' अशी कमेंट केली आहे. तर, 'आमच्याही डोळ्याखाली डार्क सर्कल आहेत. पण, हिचे तर...', 'हिचा चेहरा मेकअपशिवाय किती खतरनाक दिसतो','रात्रीच्या अंधारात हिला पाहिलं तर लोकांना हार्ट अॅटॅक येईल', अशा कितीतरी कमेंट करत लोकांनी तिला ट्रोल केलं आहे.