Video: अप्पी-अर्जुनमध्ये पुन्हा येणार दुरावा; कदमांचं घर सोडून अप्पी जाणार उत्तराखंडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 17:34 IST2024-04-23T17:33:50+5:302024-04-23T17:34:55+5:30
Appi Amchi Collector: अप्पी-अर्जुनच्या नात्यात पुन्हा येणार वादळ?

Video: अप्पी-अर्जुनमध्ये पुन्हा येणार दुरावा; कदमांचं घर सोडून अप्पी जाणार उत्तराखंडला
'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. अर्जुनला सरकारांचं सत्य समजलं आहे. सोबतच हे सत्य अप्पीला माहित असूनही तिने लपवल्यामुळे अर्जुन तिच्यावर नाराज झाला आहे. इतकंच नाही तर या सगळ्याची शिक्षा अप्पीला मिळणार आहे. अर्जुनने अप्पीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्येच आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे.
साताऱ्याची कलेक्टर असलेल्या अप्पीची लवकरच उत्तराखंडमध्ये बदली होणार आहे. त्यामुळे तिला तातडीने उत्तराखंडला जावं लागणार आहे. एकीकडे अर्जुन अप्पीवर नाराज असून तिला त्याची समजूत काढायचाही वेळ मिळणार नाहीये. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद, गैरसमज आणखी वाढणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर अप्पी आमची कलेक्टरचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. यात अप्पीने अर्जुनपासून सत्य लपवल्यामुळे तो नाराज आहे. मात्र, निदान अमोलसाठी अप्पी-अर्जुनने एकत्र यावं असं बापू त्यांना सांगतात. परंतु, त्याच दिवशी अप्पीला बदलीचे पत्र येतं. आणि, तिचं इथलं काम बघून तिची बदली उत्तराखंडला केली जाते आणि तिला ताबडतोब तिथे जावं लागणार असल्याचं कळतं.
दरम्यान, अप्पी - अर्जुनला तिची बदली झाल्याचं सांगते. मात्र, अर्जुन त्याच्या निर्णयावर ठाम असतो. त्याचं काम सोडून, इथलं सगळं आयुष्य सोडून उत्तराखंडला जाणं त्याला मान्य नाही. त्यामुळे 'अमोलला घेऊन तू एकटीच उत्तराखंडला जा', असं तो तिला सांगतो. इतकंच नाही तर सोबतच तिच्याकडून वचनही घेतो. अमोलला आपल्या बद्दल काहीही सांगू नकोस, त्याचा बाबा हरवला आहे असं सांग, असं म्हणत तो अप्पीकडून वचन घेतो. अप्पीपुढेही काही पर्याय नसल्याने अप्पी अमोलला घेऊन उत्तराखंडला निघून जाते. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ? या जोडीतील दुरावा कायम राहिल का? त्यांच्यातील मतभेद दूर होतील का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.