मराठमोळी अभिनेत्री लागली अध्यात्माच्या मार्गाला...; अॅक्टिंगला ठोकला कायमचा रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:27 IST2022-03-24T18:26:45+5:302022-03-24T18:27:15+5:30
Anupamaa : टीव्हीची नंबर 1 हिंदी मालिका ‘अनुपमा’मधील नंदिनी बऱ्याच दिवसांपासून मालिकेतून गायब आहे. कारण काय तर, तिने मालिका सोडलीये. केवळ मालिकाच नव्हे तर आता तिने ग्लॅमर इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला आहे.

मराठमोळी अभिनेत्री लागली अध्यात्माच्या मार्गाला...; अॅक्टिंगला ठोकला कायमचा रामराम
nagha Bhosale Quits Acting: टीव्हीची नंबर 1 हिंदी मालिका ‘अनुपमा’मधील (Anupamaa) नंदिनी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भोसले (Anagha Bhosale) बऱ्याच दिवसांपासून मालिकेतून गायब आहे. कारण काय तर, तिने मालिका सोडलीये. केवळ मालिकाच नव्हे तर आता तिने ग्लॅमर इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला आहे. त्यामुळे अनुपमा मालिकेत अनघा यापुढे दिसणार नाही.
अनघा भोसलेनं काळासाठी अॅक्टिंग सोडल्याची बातमी मध्यंतरीच आली होती. आता तिने अधिकृतरित्या या निर्णयाची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.
अनघाची पोस्ट...
हरे कृष्ण...! मी शोमध्ये का दिसत नाहीये, याची तुम्हा सर्वांना काळजी वाटत आहे, हे मी जाणते. तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. ज्यांना अजून माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छिते की, मी अधिकृतपणे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्राला रामराम केला आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या या निर्णयाचा आदर करावा आणि मला पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. आपण सर्व देवाची मुले आहोत यावर माझा विश्वास आहे. आपल्या सर्वांची इच्छा एकच आहे, पण फक्त आपले मार्ग वेगळे आहेत. देव माज्यासाठी नेहमीच दयाळू होता. ज्या उद्देशाने आपण सर्वजण या जीवनात आलो आहोत तो उद्देश पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. जे लोक माज्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील नवीन टप्प्यांबद्दल नेहमीच अपडेट देत राहीन. मी सर्व धर्म आणि सर्वांच्या प्रवासाचा आदर करते, असं अनघाने तिच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.
इंडस्ट्रीतील ढोंगीपणामुळे मी त्रस्त झाले...
अलीकडे ‘टेलिचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत अनघा बोलली होती. इंडस्ट्रीतील ढोंगीपणामुळे मी त्रस्त झाले असून या इंडस्ट्रीत पुढे काम करण्याची इच्छा नसल्याचं अनघाने यावेळी स्पष्ट केलं होतं. इंडस्ट्रीतील सर्वच लोक खरे नसतात. इथे प्रत्येक पावलावर दुटप्पी, ढोंगी लोक भेटतात. तुम्ही नसलेली व्यक्ती होण्यासाठी तुमच्यावर सतत दबाव असतो. स्पर्धा इतकी की, सगळेच एकमेकांना तुडवत समोर जाण्याच्या प्रयत्नात दिसतात, असं ती म्हणाली होती.
अनघाने ‘दादी अम्मा... दादी अम्मा मान जाओ’ या टीव्ही मालिकेतील छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. पण तिना खरी ओळख मिळाली ती ‘अनुपमा’ या मालिकेने.