'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:43 IST2024-09-23T16:41:29+5:302024-09-23T16:43:07+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात ज्यांना ठाम मतं नाहीत त्यांना टार्गेट करायचं होतं. त्यावेळी अंकिताने सूरजला टार्गेट केलं (Bigg boss marathi 5)

'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
बिग बॉस मराठीच्या घरात आता ट्विस्ट अँड टर्न जास्त पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीमधून प्रत्येक आठवड्यात एकामागोमाग एक स्पर्धक बाहेर पडत आहेत. काल बिग बॉसमधून अरबाज पटेलचा प्रवास संपला. आज बिग बॉस मराठीमध्ये खेळाचा नववा आठवडा सुरु होणार आहे. नियमांप्रमाणे पहिल्याच दिवशी नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या वेळी ज्यांची घरात ठाम मतं नाहीत त्या सदस्याला टार्गेट करायचं आहे.
अंकिताने केलं सूरजला टार्गेट
बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत ज्या दोन सदस्यांची ठाम मतं नाहीत, त्यांना बिग बॉसने टार्गेट करण्याचा आदेश दिलाय. यावेळी वर्षा उसगांवकर यांनी DP दादाला टार्गेट करताच तो चांगलाच चिडलेला दिसला. DP म्हणाला, "माझं काम झालेलं आहे. लोकांपर्यंत जे पोहोचवायचं ते पोहोचलेलं आहे." पुढे अंकिताची वेळ येते तेव्हा ती दुसरं नाव सूरजचं घेते. त्यावेळी सूरजच्या शेजारी उभी असलेली निक्की त्याला म्हणते, "ही असलीयत आहे. भाऊ भाऊ बोलून गळा पकडायचा." आज कोण नॉमिनेट होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
बिग बॉसचा खेळ १०० नव्हे तर ७० दिवसांचा
बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन १०० नव्हे तर ७० दिवसांचा असणार अशी चर्चा होती. परंतु या चर्चा खऱ्या असल्याचं स्पष्ट झालंय. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन ७० दिवसांचा असल्याचा खुलासा कलर्स मराठी चॅनलच्या वरिष्ठ अधिकारी सुगंधा लोणीकर यांनी केलाय. यामागचं कारण लवकरच स्पष्ट करण्यात येईल. यंदाचा सीझन ७० दिवसांचा असल्याने पुढील रविवारी म्हणजेच ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची ग्रँड फिनाले रंगेल.