'कोकण हार्टेड बॉय' भेटायला घरात का आला नाही? अंकिता म्हणते, "तो खूप विचार करुन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:14 IST2024-10-08T15:14:18+5:302024-10-08T15:14:52+5:30

अंकिताचा होणारा नवरा कसा आहे?

Ankita Walawalkar reveals why kokan hearted boy didnt came to mee her in bb house | 'कोकण हार्टेड बॉय' भेटायला घरात का आला नाही? अंकिता म्हणते, "तो खूप विचार करुन..."

'कोकण हार्टेड बॉय' भेटायला घरात का आला नाही? अंकिता म्हणते, "तो खूप विचार करुन..."

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ((Bigg Boss Marathi 5)  दिसलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल नावाने ओळखली जाणारी अंकिता लवकरच लग्न करणार आहे. मात्र तिचा होणारा नवरा कोण हे तिने गुपितच ठेवले आहे. बिग बॉसच्या घरात असतानाही अनेकदा तिने होणाऱ्या नवऱ्याचा उल्लेख केला पण नाव सांगितलं नाही. आता बाहेर आल्यावर अंकिताने तिच्या लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.

सोशल मीडियावरील सर्वच चाहत्यांना कोकण हार्टेड बॉय कोण असेल याची उत्सुकता लागली आहे. नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, "मी बिग बॉसच्या घरात वाट बघून बघून थकले. बाहेर आल्यावर त्याला विचारलं की का नाही आलास तू? मला सगळ्यांना दाखवायचं होतं की कोण आहेस तू. पण मी म्हणेन की बिग बॉसचा प्रवास हा खूप  उबडखाबड असतो. काहीही  होऊ शकतं. मी आतमध्ये आहे माझा बाहेरच्या जगाशी संपर्क नाही. त्यामुळे मला तिथे लोकांशी संवादच साधता येत नव्हता. अशा ठिकाणी अशी नाजूक गोष्ट लोकांसमोर आणणं हे त्याला योग्य वाटलं नाही."


ती पुढे म्हणाली, "तो खूप विचार करुन वागणारा मुलगा आहे. खूप समंजस आहे. माझ्यासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली म्हणजे तुम्ही विचार करु शकता की त्याचं काय होणारे. मला खूप समजावतो तो. तसंच त्याने यावेळीही समजावलं. फेब्रुवारीच्या आधी आमचा लग्नाचा विचार आहे. लवकरच आम्ही तुमच्या सर्वांसमोर येऊ."

Web Title: Ankita Walawalkar reveals why kokan hearted boy didnt came to mee her in bb house